फलटण तालुक्यात ३९ बाधित; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:37 IST2021-03-25T04:37:52+5:302021-03-25T04:37:52+5:30
फलटण : फलटण तालुक्यात बुधवारी ३९ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरातील २४, तर ...

फलटण तालुक्यात ३९ बाधित; एकाचा मृत्यू
फलटण : फलटण तालुक्यात बुधवारी ३९ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरातील २४, तर ग्रामीण भागातील १५ रुग्ण मिळून आले आहेत, तर एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.
फलटण शहरात फलटण येथे ३, उमाजी नाईक चौक १, शुक्रवार पेठ १, दत्तनगर १, सोमवार पेठ १, रविवार पेठ ४, लक्ष्मीनगर ४, संजीवराजेनगर २, नारळी बाग १, गिरवी नाका ३, मारवाड पेठ १, गजानन चौक १, तर पुजारी कॉलनीत एक, अशा व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. ग्रामीण भागातील तरडगाव १, वाखरी १, जाधववाडी २, विंचुर्णी १, सोनवडी खुर्द १, आसू १, हणमंतवाडी १, उपळवे १, कोळकी १, तावडी २, वडगाव १, बिरदेवनगर १, धावली १, अशा व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. राजुरी (ता. फलटण) येथील ५५ वर्षीय पुरुषाचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.