शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील डाॅक्टरची ३५ लाखांची फसवणूक, संशयित आरोपी नागपूर जेलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 20:25 IST

सीटी स्कॅन मशीनसाठी कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून फसवले.

सातारा: सीटी स्कॅन मशीनसाठी कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून साताऱ्यातील एका प्रसिद्ध डाॅक्टरची तब्बल ३५ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ज्याने डाॅक्टरांची फसवणूक केली तो संशयित आरोपी सध्या नागपूर कारागृहात असून, त्याने अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

मनीष अशोक अग्रवाल (वय १९, रा. प्रतीक नगर पुणे, मूळ रा. कोलकत्ता) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील एका प्रसिद्ध डाॅक्टरांना सीटी स्कॅन मशीन खरेदी करायची होती. यासाठी त्यांनी पुण्यातील एका बँकेत कर्जप्रकरण केले होते. त्यावेळी तेथे मनीष अग्रवाल हा एजंट म्हणून काम करत होता.

अग्रवाल याने संबंधित डाॅक्टरांकडून विविध कारणे सांगून पैसे उकळण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या प्रोसेसिंग फी म्हणून तो पैसे उकळू लागला. एवढेच नव्हे तर वर्षभरापूर्वी तो कोलकात्याला कुटुंबासह गेला होता. त्यावेळी त्याला पुण्यात विमानाने येण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्याने डाॅक्टरांना ६९ हजारांचे विमानाचे तिकीट काढण्यास सांगितले. डाॅक्टरांनीही लवकर कर्ज मंजूर होईल, या आशेने त्याचे विमानाचे तिकीट काढले. मात्र, तरीही त्याची पैशाची भूक काही कमी होत नव्हती.

वर्षभरात डाॅक्टरांनी मनीष अग्रवाल याला तब्बल ३५ लाख २ हजार ६७० रुपये दिले. दरम्यान, अग्रवाल याने अशाच प्रकारे अन्य काही लोकांना फसविल्याचे समोर आले. त्याच्याविरोधात तक्रारींचा ओघ सुरू झाला. नागपूर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली. सध्या तो नागपूरच्या कारागृहात आहे. त्याने अनेकांना फसविल्याचे साताऱ्यातील डाॅक्टरांनाही समजल्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे हे अधिक तपास करीत आहेत.सातारा पोलिस घेणार ताबानागपूर कारागृहात असलेला मनीष अग्रवाल याचा ताबा आता सातारा पोलिस घेणार आहेत. त्याने सातारा जिल्ह्यात अशा प्रकारे आणखी कोणाला फसविले आहे का, याची पोलिस चाैकशी करणार आहेत.

टॅग्स :satara-pcसाताराCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी