शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सैन्यभरतीच्या आमिषाने सातारा जिल्ह्यातील युवकांची ३४ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 12:03 IST

युवकांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

सातारा : भारतीय सैन्यदल व भारतीय रेल्वे डीआरडीओ बीएमसी आदी ठिकाणी कामाला लावतो, या आमिषाने सातारा जिल्ह्यातील शंभराहून अधिक युवकांची फसवणूक झाली आहे. काही युवकांची तब्बल ३४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती कुडाळ तालुका जावळी येथील राजेंद्र दिलीप भिलारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भिलारे यांनी म्हणाले की, हृषिकेश शंकर फाळके, राजेंद्र कालीदास देवकर, तानाजी शंकर देवकर, महेंद्र गजानन शेवते, रवींद्र बाळकृष्ण चव्हाण व चैतन्य तात्यासोा तुपे या तरुणांची झालेली फसवणूक प्राथमिक स्वरूपाची आहे. सातारा जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर व पुणे येथीलही शेकडो तरुणांना नोकरीच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा घालण्यात आलेला आहे वरील सहा तरुणांची ३४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

भिलारे पुढे म्हणाले, राजेंद्र दिनकर सपकाळ रा. नांदगिरी (धुमाळवाडी) ता. कोरेगाव यानेही फसवणूक केली असून डीआरडीओ, बीएमसी, भारतीय लष्कर, भारतीय रेल्वे येथे कामाला लावतो असे सांगून त्या मुलांचा विश्वास संपादन केला. काही मुलांची कामे केल्याचे भासवून त्यांना कॉल लेटर मोबाईलमध्ये दाखवले. काही मुलांनी त्याला पन्नास हजार रुपये अनामत रक्कम देऊन उरलेली रक्कम वाराणसी येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर देण्याचे कबूल करण्यात आले.राजेंद्र सपकाळ यांची पत्नी संध्याराणी सपकाळ यांच्या अकौंटला काही मुलांनी रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केली आहे. हे तरुण या सर्व गोष्टींना साक्षीदार आहेत. गेली पाच वर्षे सपकाळ या माणसाला आम्ही वारंवार फोन करून पैसे मागत असताना तो टाळाटाळींची उत्तरे देत आहे तसेच जीवे मारण्याची धमकी देत आहे. पोलिस व प्रशासन कोणी माझे वाकडे करून शकत नाही. माझी खूप मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख आहे. त्यामुळे तुम्ही माझे काही करू शकत नाही, अशी धमकी राजेंद्र सपकाळ देत असल्याचा आरोप तरुणांनी केला आहे.युवकांचा बेमुदत उपोषणाचा इशारापोलिसांकडे या प्रकरणाची वारंवार तक्रार करूनही त्यांची दखल घेतली जात नाही. आम्ही पैसे घेण्यासाठी घरी गेलो असता सध्या संध्याराणी सपकाळ शिवीगाळ व वाईट वर्तन करत असून पोलिसात तक्रार करण्याची, अशा धमकी देत आहेत. यासंदर्भात आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही सर्व पीडित तरुण जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरIndian Armyभारतीय जवानfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी