जिल्हा परिषदेच्या ३२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:46 IST2021-03-01T04:46:58+5:302021-03-01T04:46:58+5:30

सातारा : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील ३२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. तसेच त्यांना बदली आदेशही देण्यात आला आहे. जिल्हा ...

32 employees of Zilla Parishad promoted | जिल्हा परिषदेच्या ३२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

जिल्हा परिषदेच्या ३२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

सातारा : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील ३२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. तसेच त्यांना बदली आदेशही देण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाने पदोन्नतीची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत वरिष्ठ सहायकमधून कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून पाचजणांना पदोन्नती देण्यात आली, तर कनिष्ठ सहायकमधून वरिष्ठ सहायकची १० जणांना, तसेच परिचरमधून कनिष्ठ सहायकची १७ जणांना पदोन्नती मिळाली. हे सर्वजण विविध विभागांतील आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली पदोन्नतीची ही प्रक्रिया राबविण्यात आली.

फोटो दि.२९सातारा झेडपी प्रमोशन नावाने...

फोटो ओळ : सातारा जिल्हा परिषदेतील पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. यावेळी मनोज जाधव उपस्थित होते.

..............................................

Web Title: 32 employees of Zilla Parishad promoted