जिल्ह्यात ३०८ नवे बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST2021-09-07T04:47:32+5:302021-09-07T04:47:32+5:30
सातारा : जिल्ह्यात ३०८ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित असून, एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली असल्याने ...

जिल्ह्यात ३०८ नवे बाधित
सातारा : जिल्ह्यात ३०८ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित असून, एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यात सर्वाधिक ७५ रुग्ण आढळले, तर त्याखालोखाल सातारा तालुक्यात ६८ रुग्ण आढळून आले आहेत. कऱ्हाड ३२, खंडाळा ११, खटाव ३५, कोरेगाव २१, माण ४५, महाबळेश्वर १, पाटण २, वाई १० व इतर ८ असे आजअखेर एकूण २ लाख ४२ हजार ३०६ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण ६ हजार ६१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या सोमवारी संध्याकाळपर्यंत ५७४ जणांना घरी सोडण्यात आले असून, १० हजार ७४३ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.