शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

३०७ मध्ये जामीनावर आहे, विसरु नको; धमकी देत लाखाची मागणी, साताऱ्यातील प्रकार 

By नितीन काळेल | Updated: January 19, 2024 18:32 IST

सातारा : एक लाख रुपये दे नाहीतर तुला सोडणार नाही, मी ३०७ मध्ये जामीनावर आहे हे विसरु नको, सब ...

सातारा : एक लाख रुपये दे नाहीतर तुला सोडणार नाही, मी ३०७ मध्ये जामीनावर आहे हे विसरु नको, सब को मार दूंगा अशी धमकी देणाऱ्याच्या विराेधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. यातील संशयित हा कऱ्हाड तालुक्यातील आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी मुकुंद नामदेव कदम-पाटील (रा. हजारमाची, ता. कऱ्हाड) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार फिरोज सलीम खान (रा. ओगलेवाडी, ता. कऱ्हाड) याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार यातील तक्रारदार हे ओगलेवाडी येथील ओगले ग्लास वर्क्सचे संचालक आहेत. दि. १७ जानेवारी रोजी दुपारी अडीचच्या सुमारास सातारा शहरातील जिल्हा परिषदेसमोर रस्त्यावर हा प्रकार घडला. संशयिताने मी तुझ्याविरोधात ग्रामपंचायत आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे दिलेले अर्ज फुकट मागे येतात. मला एक लाख रुपये द्या असे म्हटले. यावर तक्रारदार यांनी संशयिताला खोटेनाटे अर्ज करुन मला पैसे मागू नकोस असे म्हटले. यावरुन संशयित फिरोज खान याने एक लाख रुपये द्यावेच लागतील असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. तसेच सबको मार दूंगा, खल्लास करुंगा, तुझे घरदार संपवीन, मै खानसाब हूॅं, ३०७ मध्ये जामीनावर आहे विसरु नको, अशी धमकी दिली. या प्रकारानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात मुकुंद कदम यांनी तक्रार दिली.सातारा शहर पोलिसांनी धमकी देऊन पैशांची मागणी केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक शितोळे हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस