२७ लाख नवे करदाते आयकराच्या जाळ्यात
By Admin | Updated: December 20, 2015 22:38 IST2015-12-20T22:38:18+5:302015-12-20T22:38:18+5:30
देशात नव्याने २७ लाख करदाते कर आकारणीच्या जाळ्यात आले आहेत. आर्थिक वर्ष २०१५-२०१६ मध्ये आयकराच्या जाळ्यात एक कोटी नवे करदाते आणण्याचे आयकर विभागाचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे.

२७ लाख नवे करदाते आयकराच्या जाळ्यात
सातारा : सभापतीपदांसाठी इच्छुकांची यादी मोठी असली तरी ‘नविआ’तून दीपलक्ष्मी नाईक, महेश जगताप यांची नावे चर्चेत आहेत. मात्र ‘साविआ’ची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे ‘साविआ’मध्ये उत्सुकता ताणली आहे.
सातारा पालिकेत विषय समित्यांच्या निवडीसाठी सोमवार, दि.२१ रोजी पालिकेची विशेष सभा बोलविण्यात आली आहे. मनोमिलनानुसार आरोग्य नियोजन महिला बालकल्याण ही पदे ‘साविआ’कडे तर पाणीपुरवठा बांधकाम महिला बालक्याण उपसभापतिपद ‘नविआ’च्या वाट्याला येणार आहेत. मात्र, या शेवटच्या वर्षासाठी सभापतीपद मिळावे यासाठी एकमेकांमध्ये जोरदार रस्सीखेच होणार आहे.प्रांताधिकारी रवींद्र खेबूडकर हे पीठासन अधिकारी असून, पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात विशेष सभा होत आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करावयाचे असून, दुपारी १ वाजता होणाऱ्या विशेष सभेत नव्या पदाधिकाऱ्यांची निवडी होणार आहेत. नामनिर्देशन पत्रे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे सादर करावयाचे आहेत. मनोमिलनानुसार पाणीपुरवठा बांधकाम व महिला बालकल्याण उपसभापतिपद हे नगर विकास आघाडीकडे येणार असून, आरोग्य नियोजन व महिला बालकल्याण या समित्या सातारा विकास आघाडीकडे येणार आहेत.दोन्ही आघाड्यांमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची चर्चा रविवारी दिवसभर सुरू होती. काहीजणांनी आपल्या समर्थकांसह नेत्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु नेते बाहेर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते परत आले. (प्रतिनिधी)
समाजकल्याण सभापतीची निवड पुढील महिन्यात
खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून रविवारी दिवसभरात सभापतीपदासाठीची नावे शिक्कामोर्तब करण्यात आली नव्हती. त्यामुळे सकाळी निवडीच्या काहीवेळ अगोदर सभापतीपदाची नावे त्या-त्या पदाधिकाऱ्यांना आघाडीकडून सांगितली जातील, असे सांगण्यात आले. मागासवर्गीय विशेष समाजकल्याण सभापतीची निवड पुढील महिन्यात होणार आहे. ते खाते नगरविकास आघाडीकडे जाणार आहे.