शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

जुन्या पेन्शनसाठी पुन्हा एल्गार, सातारा जिल्ह्यातील २५ हजार कर्मचारी जाणार संपावर

By नितीन काळेल | Updated: December 9, 2023 18:34 IST

शासकीय कामकाज होणार ठप्प 

सातारा : ‘एकच मिशन-जुनी पेन्शन’ या प्रमुख मागणीसह अन्य प्रश्नांसाठी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वर्ग ३ आणि ४ मधील कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला असून १४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातीलही २५ हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी होणार आहेत. या कारणाने शासकीय कामकाज ठप्प होणार असून याचा फटका सर्वांनाच बसणार आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू करावी ही मागणी अनेक वर्षांपासून आहे. तरीही शासनाकडून डोळेझाक होत आहे. यासाठी आता १४ डिसेंबरपासून राज्यभरात बेमुदत संप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांही करण्यात आलेल्या आहेत.यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे, रिक्त पदे भरली जावीत, विनाअट अनुकंपा नियुक्ती करणे, कंत्राटीकरण धोरणाचे उच्चाटीकरण करणे, चतुऱ्थश्रेणी कर्मचारी आणि वाहनचालक पद भरतीवरील बंदी उठविणे. शिक्षण क्षेत्रातील दत्तक योजना, समुह शाळा योजनांद्वारे शाळांचे होणारे कार्पोरेट धार्जिणे खासगीकरण धोरण रद्द करणे, नवीन शिक्षण धाेरणाचा पुनर्विचार करणे, पाचव्या वेतन आयोगापासून वेतनत्रुटी दूर करण्यासाठी यंत्रणा स्थापित करणे, सेवानिवृत्तीचे वय ६० करावे आदी मागण्यांसाठी हा संप करण्यात येत आहे.राज्यात हा संप सुरू होणार असून सातारा जिल्ह्यातीलही शासकीय, निमशासकीय कार्यालयातील वर्ग ३ आणि ४ चे कर्मचारी सहभागी होणार आहेत. तसेच शिक्षकांचाही या संपात समावेश असणार आहे. सुमारे २५ हजरांहून अधिक कर्मचारी सहभागी होणार आहेत. यामुळे यंत्रणा ठप्प होणार आहे. याचा परिणाम कार्यालयातील कामकाजावर होणार आहे.

जिल्ह्यातील संपात सहभागी कर्मचारी अंदाजे..

  • राज्य सरकारी कर्मचारी १७,३५०
  • जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचारी शिक्षकांसह १२,७००
  • माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर २,१००
  • उच्च माध्यमिक व शिक्षकेत्तर ७००
  • नगरपंचायत अन् नगरपालिका ३५०

मार्चमध्ये संप अन् आश्वासन..कर्मचाऱ्यांनी मार्च महिन्यात विविध मागण्यांसाठी संप केला होता. हा संप ७ दिवस चालला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर आश्वासनामुळे संप मागे घेतला. त्यातील ग्रॅच्युईटी आणि कुटुंब निवृत्त वेतन या दोन मागण्या मान्य झाल्या. जुनी पेन्शन योजनेसह इतर मागण्यांबाबत काहीच झाले नाही.

मार्च महिन्यात संप केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक झाली होती. समिती नेमून तीन महिन्यांत जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आश्वासन दिले होते. तो शब्द आतापर्यंत पाळलेला नाही. त्यामुळे १४ डिसेंबरपासून कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत. - गणेश देशमुख, राज्य कोषाध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPensionनिवृत्ती वेतनagitationआंदोलन