शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बळीराजाला दिलासा! अतिवृष्टीबाधितांना १४ कोटी; सातारा जिल्ह्यात २१ हजार शेतकरी लाभार्थी 

By नितीन काळेल | Updated: April 5, 2023 12:57 IST

उशिरा का असेना शासनाने मदत निधी मंजूर केला. ही मदत लवकर मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

सातारा : जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमधील बाधित शेतकऱ्यांना मदत निधी मंजूर झाला आहे. या अंतर्गत २१ हजार ४८७ शेतकऱ्यांना १४ कोटी ४ लाख रुपये नुकसानीपोटी मदत मिळणार आहे. यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी शासनाने पीक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याची सूचना प्रशासनाला केली होती. त्यानंतर प्रशासनानेही युद्धपातळीवर पंचनामे करुन नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर केला होता. मात्र, त्याची मदत आता जाहीर झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना १४ कोटी ४ लाख १८ हजार रुपयांची मदत मिळणार आहे.फलटण तालुक्यातील २ हजार ६५८ शेतकऱ्यांचे ८७३ हेक्टरचे नुकसान झाले होते. यासाठी २ कोटी २८ लाख ४४ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. कोरेगाव तालुक्यातील ६८४ शेतकऱ्यांच्या २०८ हेक्टरसाठी ३५ लाख ८८ हजार, कऱ्हाड तालुक्यातील १६८ शेतकऱ्यांना ३३ हेक्टरसाठी ६ लाख ७ हजार रुपये मदतीसाठी वितरित केले जाणार आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील ५४४ शेतकऱ्यांचे १७६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना आता ४७ लाख ५६ हजार, पाटणमधील ३७२ शेतकऱ्यांना ४०.६१ हेक्टरसाठी ३ लाख ९३ हजार रुपयांचा मदत निधी मंजूर झालेला आहे. तर खंडाळा तालुक्यातील ७ हजार ७८० शेतकऱ्यांचे १ हजार ८५५ हेक्टरवरील पीक बाधित झाले होते. या शेतकऱ्यांना ४ कोटी ३३ लाख २५ हजार रुपये मिळणार आहेत. खटाव तालुक्यातील ४ हजार ४३३ शेतकऱ्यांना १ हजार ५४७ हेक्टरवरील नुकसानीपोटी ३ कोटी ६४ लाख ३९ हजार, माण तालुक्यातील ३ हजार २२१ शेतकऱ्यांना १ हजार ५० हेक्टरसाठी २ कोटी ५८ लाख ४६ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर सातारा तालुक्यातील ३२ शेतकऱ्यांचे सुमारे आठ हेक्टरचे नुकसान झालेले. त्यासाठी १ लाख ११ हजार, जावळी तालुक्यातील ७३ शेतकऱ्यांना ७७ हजार आणि वाई तालुक्यातील १ हजार ५२२ शेतकऱ्यांना २४ लाख ३२ हजार रुपये भरपाई मिळणार आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातील एकूण २१ हजार ४८७ शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झालेली आहे.

सहा हजार हेक्टरचे नुकसान; भरपाई लवकरची अपेक्षा...जिल्ह्यात गेल्यावर्षी सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये ५ हजार ९७३ हेक्टरवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले होते. यामुळे बळीराजा कोलमडून पडला होता. आता उशिरा का असेना शासनाने मदत निधी मंजूर केला आहे. ही मदत लवकर मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी