शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकाची कर्जाच्या आमिषाने ३१ लाखांची फसवूणक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 14:09 IST

कंपनी खरेदीसाठी सहा कोटींचे कर्ज देण्याच्या आमिषाने पाचगणी येथील उद्योजकाची तब्बल ३१ लाख ७५ हजारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका महिलेसह पाचजणांवर गुन्हा दाखल झाला असून, यामध्ये सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि खंडाळा तालुक्यातील संशयितांचा समावेश आहे.

ठळक मुद्देउद्योजकाची कर्जाच्या आमिषाने ३१ लाखांची फसवूणक, पाचजणांवर गुन्हावाळवा अन् खंडाळा तालुक्यातील संशयितांचा समावेश

सातारा : कंपनी खरेदीसाठी सहा कोटींचे कर्ज देण्याच्या आमिषाने पाचगणी येथील उद्योजकाची तब्बल ३१ लाख ७५ हजारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका महिलेसह पाचजणांवर गुन्हा दाखल झाला असून, यामध्ये सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि खंडाळा तालुक्यातील संशयितांचा समावेश आहे.आदित्य शशांक माने, अ‍ॅड. शशांक सखाराम माने, आदित्य माने याची आई (सर्व रा. मानेवाडा, पेठ नाक्याजवळ, ता. वाळवा, जि. सांगली), संजय राघू नवले (रा. गोंदवले, ता. माण), माधवी जवळकर (रा. खंडाळा, ता. खंडाळा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रोहिदास ज्ञानदेव राजपुरे (वय ३८, रा. पाचगणी, ता. महाबळेश्वर) यांचा आंबेघर तर्फ कुडाळ, ता. जावळी येथे महाबळेश्वर फुड प्रोडक्टस या नावाने फरसान बनविणे व विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यवसायातून त्यांची यातील संशयित आरोपी संजय नवले (रा. गोंदवले, ता. माण) याच्यासमवेत गेल्या दहा वर्षांपासून ओळख आहे.

दरम्यान, वाई येथील एक कंपनी लिलावामध्ये निघाली होती. ही कंपनी विकत घेण्याचे राजपुरे यांनी ठरवले होते. संबंधित कंपनी खरेदीसाठी ६ कोटी इतक्या रकमेची आवश्यकता होती. ही बाब त्यांनी नवले याला सांगितली. त्याने आदित्य माने, शशांक माने तसेच माधवी जवळकर यांचा ग्रुप असून हा ग्रुप बँक कर्ज करून देत असल्याचे सांगितले. त्यानुसार राजपुरे यांनी संबंधितांशी संपर्क साधला असता त्यांनी विविध कारणे देत पैसे उकळण्यास सुरूवात केली.

अडीचशे ते तीनशे कोटींचे कर्ज यापूर्वी काहींचे मंजूर झालेले त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे राजापुरे यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. सहा कोटींच्या कर्जासाठी प्रोसेसिंग फी म्हणून कर्ज रकमेच्या पाच टक्के आम्हास द्यावी लागेल, असे संबंधितांनी अगोदरच त्यांना सांगितले होते.

संबंधितांकडून विविध कारणे सांगली जात होती. त्यामुळे टप्प्याटप्याने राजपुरे यांनी तब्बल ३१ लाख ७५ हजारांची रक्कम त्यांना दिली. मात्र,तरीही त्यांच्याकडून कर्ज मंजूर होत नसल्याने त्यांनी विचारणा केली. परंतु उलट त्यांनाच धमकावण्यात आले. शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर