तीन महिन्यांत १९६५ मेट्रिक टन उसाचे गाळप
By Admin | Updated: February 9, 2015 00:42 IST2015-02-08T23:50:57+5:302015-02-09T00:42:21+5:30
हंगाम शेवटच्या टप्प्यात: एक लाख ६३ हजार साखर पोत्यांचं उत्पादन

तीन महिन्यांत १९६५ मेट्रिक टन उसाचे गाळप
पाटण : तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवसंजिवनी ठरणाऱ्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचा यावर्षीचा गळीत हंगाम जोमाने सुरू असून, गाळपाच्या ८३ व्या दिवशी कारखान्यातून १ लाख ६३ हजार ५२५ साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. गळीत हंगाम शेवटच्या टप्प्यांवर आला असताना कारखान्याच्या कार्य क्षेत्रातील नोंदीत ऊस अद्यापही शेतात उभा असून, ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. तरीदेखील नोंदलेले सर्व गाळप केल्याशिवाय कारखान्याचा बॉयलर बंद होणार नाही, अशी माहिती कारखाना व्यवस्थापनाने दिली आहे.१,२५० मेट्रिक टन गाळप क्षमता असणाऱ्या देसाई कारखान्याची साखर उताऱ्यात १,२४५ इतकी दर्जेदार आघाडी आहे. आजअखेर १,९६५ मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. राजकीय गटबाजी व संघर्षातून तालुक्यात कारखाना असून, अनेक शेतकऱ्यांचा ऊस रयत व जयवंत शुगर कारखान्यांकडे गाळपास नेला जातो. तसेच अनेक शेतकरी गुऱ्हाळ्यास ऊस देऊन मोकळे झाले आहेत. तरीसुद्धा तालुक्यातील अनेक गावांमध्ये कारखान्याची ऊसतोड यंत्रणा पोचली नसल्यामुळे ऊस वाळून जात आहे. त्यामुळे शेतकरी कारखाना व्यवसायाकडे धाव घेत आहेत. यावर्षी ऊस उत्पादन वाढल्यामुळे देसाई कारखान्याकडे गाळपासाठी जाणाऱ्या उसाचे प्रमाण वाढले असून, कारखाना परिसरात उसाने भरलेले ट्रक व ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या
आहेत. (प्रतिनिधी)
'फेरबदल करता येत नाही
यावर्षी हंगामात स्वतंत्र उसाचे उत्पादन वाढले आहे. कारखान्याकडे नोंद केल्यानुसार ऊसतोडीचा कार्यक्रम ठरलेला असतो. तशी नोंद संगणकावर असते. त्यात फेरबदल करता येत नाही. देसाई कारखान्याचा उसाचा दर ठरविणे हे व्यवस्थापन निर्णय घेईल नोंदलेला ऊस गाळप केल्याशिवाय कारखान्याचे गळप बंद होणार नाही. एफआरपीनुसार ऊसदर देण्याचा विचार आहे. असेही कारखान्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.