आजी-माजी सैनिक तक्रार निवारण मेळाव्यात १९ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:38 IST2021-02-13T04:38:36+5:302021-02-13T04:38:36+5:30
सातारा : आजी, माजी सैनिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या तक्रार निवारण मेळाव्यात १९ अर्ज प्राप्त झाले. यातील सर्व ...

आजी-माजी सैनिक तक्रार निवारण मेळाव्यात १९ अर्ज
सातारा : आजी, माजी सैनिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या तक्रार निवारण मेळाव्यात १९ अर्ज प्राप्त झाले. यातील सर्व अर्ज हे दिवाणी स्वरूपाचे अन् महसूल विभागाशी निगडित असल्याचे समोर आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन करून त्यांना संबंधित विभागाशी संपर्क करण्याचा सल्ला दिला. योग्य मार्गदर्शन मिळाल्याने आजी-माजी सैनिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून आजी, माजी सैनिकांचा तक्रारी मेळावा सुरू करण्यात आला. या मेळाव्याला मिळत असलेला प्रतिसाद पाहून पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी हा मेळावा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी सकाळी सैन्य दलाच्या तिन्ही दलांतील आजी-माजी सैनिक व त्यांचे नातेवाईक यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी तक्रार निवारणासाठी एकूण सैनिक, नातेवाईक असे मिळून २८ जण उपस्थित होते.
सातारा पोलीस उपविभागातील एकूण ७, इतर पोलीस उपविभाग ५ तसेच पोलिसांव्यतिरिक्त इतर विभाग ७ असे एकूण १९ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांना सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधीक्षक (गृह), सातारा राजेंद्र साळुंखे यांनी स्वत: मार्गदर्शन करून त्यांच्या तक्रारींचे निवारण होण्यासाठी प्रयत्न करून योग्य मार्गदर्शन केले. त्यांचे तक्रारी अर्ज योग्य त्या विभागाकडे पाठवले. मेळाव्यास पोलीस दलाव्यतिरिक्त महसूल विभागाच्या तहसीलदार अनिता देशमुख, सैनिक कल्याण कार्यालयाचे अण्णासाहेब कोडग, ए.डी. गवळी, भूमिअभिलेख कार्यालय सातारा जे.एन. काकडे, विस्तार अधिकारी पंचायत समिती सातारा अॅड. प्रसाद सुतार आदी उपस्थित होते.