साताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्यांच्या १८ दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:41 IST2021-05-21T04:41:44+5:302021-05-21T04:41:44+5:30
सातारा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येत असून बुधवार आणि गुरुवारी या दोन दिवसांत शहरात २१ ...

साताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्यांच्या १८ दुचाकी जप्त
सातारा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येत असून
बुधवार आणि गुरुवारी या दोन दिवसांत शहरात २१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये १८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत तसेच दोन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मार्केटयार्ड परिसरात हॉटेल मनालीसमोर संचारबंदीचा आदेश मोडून विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या अभिषेक राजेंद्र बारवडे (रा. मल्हारपेठ, सातारा), चंद्रकांत धोंडिबा देवरे (रा. केसरकरपेठ, सातारा), महेश उत्तम वाघमारे (रा. सातारारोड, ता. कोरेगाव), जगन्नाथ शिवाजी निकम (रा. करंजे पेठ, सातारा), चंद्रकांत जयशंकर हादगे (रा. पंताचा गोट, सातारा), भरत संपत काटकर, (रा. त्रिपुटी, ता. कोरेगाव, सविता उमेश मोरे (रा. पंताचा गोट, सातारा), कृष्णात रामचंद्र धोंडवड (रा. तासगाव, ता. सातारा), सचिन मुरलीधर सुतार (रा. पंताचा गोट, सातारा), सागर पोपट किर्दत, (रा. करंजे, सातारा), गुलाब गायकवाड (रा. आरळे, ता. सातारा), सुरेश काशीनाथ शिंदे (रा. पाटखळ, ता. सातारा) यांच्यावर कारवाई करून पोलिसांनी त्यांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध पोलीस नाईक राहुल खाडे, पोलीस नाईक सुनील कर्णे, कॉन्स्टेबल चेतन ठेपणे यांनी तक्रार दिली आहे. यावेळी दोघेजण पळून गेले असून त्यांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
पोवईनाका परिसरात विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या सागर बापूराव लंगोटे, (रा. मयुरेश्वर कॉलनी, सदरबझार, सातारा), असलम कैस महंमद पाशा (रा. सदरबझार, सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध पोलीस नाईक लक्ष्मण दगडे यांनी तक्रार दिली आहे.
बॉम्बे रेस्टाॅरंट परिसरात प्रफुल्ल प्रकाश कांबळे (रा. मधुश्री पार्क, वाढेफाटा, सातारा), शुभम अरविंद मगर (रा. जय शिव कॉलनी, सदरबझार, सातारा), नितीन संपत निकम (रा. लिंबाचीवाडी, ता. सातारा) यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरु्ध पोलीस नाईक जितेंद्र चव्हाण यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
यादोगोपाळ पेठेत दुकान उघडे ठेवणाऱ्या श्री फूडस दुकानाचे मालक अक्षय रमेश भोसरकर (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) यांच्यावर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरुद्ध अमर काशीद यांनी तक्रार दिली आहे. सदरबझार परिसरात दुकान सुरू ठेवणाऱ्या किरण परशुराम निकम (रा. तामजाईनगर, सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरुद्ध कॉन्टेबल संतोष कचरे यांनी तक्रार दिली आहे.