शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

साताऱ्याजवळ शिरूरच्या कांदा व्यापाऱ्याची १८ लाखांची रोकड लांबविली

By दत्ता यादव | Updated: December 4, 2023 15:15 IST

पाळत ठेवणारी टोळी कार्यरत..

सातारा : बेळगावहून पुण्याकडे जात असताना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एका कांदा शेतकऱ्याची तब्बल १८ लाखांची रोकड अज्ञात चोरट्याने हातोहात लांबविली. ही धक्कादायक घटना दि. ३ रोजी पहाटे सव्वातीन वाजता वाढे फाटा येथे घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सतीश शंकर ढवळे (वय ३५, रा. वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे) हे शेतकरी असून, कांदा विक्रीसाठी ते टेम्पो घेऊन बेळगावला गेले होते. कांदा विक्रीतून आलेली रोकड त्यांच्याजवळ त्यांनी ठेवली होती. त्यांच्यासोबत अन्य दहाजण होते. हे सर्वजण टेम्पोमधून लोणंदमार्गे शिरूरला निघाले होते. यावेळी वाढे फाट्यावर आल्यानंतर सर्वजण रात्री चहा पिण्यासाठी खाली उतरले. याचवेळी अज्ञात चोरट्याने टेम्पोमध्ये ठेवलेल्या बॅगेतील १८ लाख ९२ हजार ५०० रुपयांची रोकड तसेच मोबाइल, पाकीट, कागदपत्रे हातोहात लांबविली. चहा पिऊन आल्यानंतर सर्वजण पुढील प्रवासाला निघाले. लोणंदमार्गे जात असताना काही अंतर पुढे गेल्यावर त्यांना बॅगेत पैसे नसल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी जिथं चहा पिला. त्या ठिकाणी परत येऊन चाैकशी केली. मात्र, त्यांचे पैसे काही सापडले नाहीत. चोरट्यांनी पाळत ठेवून त्यांच्या एवढ्या मोठ्या रकमेवर डल्ला मारल्याचे समोर आले. रात्री आठ वाजता त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने हे अधिक तपास करीत आहेत.

पाळत ठेवणारी टोळी कार्यरत..वाढे फाट्यावर यापूर्वीही एका कार चालकाच्या बॅगमधून रोकड, मोबाइल, कागदपत्रे असा ऐवज चोरीस गेला होता. कारची काच फोडून चोरट्यांनी ऐवज चोरला होता. पुन्हा एकदा याच परिसरात अशाच प्रकारची घटना घडल्याने या ठिकाणी मोठी टोळी कार्यरत असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रवाशांवर पाळत ठेवून त्यांच्या वाहनातील ऐवज चोरून नेला जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस