फलटण तालुक्यात १५३ नवे कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:39 IST2021-04-08T04:39:58+5:302021-04-08T04:39:58+5:30
फलटण : जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात १५३ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. ...

फलटण तालुक्यात १५३ नवे कोरोनाबाधित
फलटण : जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात १५३ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात ६७ व्यक्ती, तर ग्रामीण भागात ८६ रुग्ण सापडले आहेत.
दुसऱ्या लाटेत प्रथमच १५३ रुग्ण सापडले आहेत, तर एका बधिताचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाचा धोका वाढला असून, ही बाब भयंकर असून, चिंता वाढविणारी आहे.
फलटण शहरात ६७ कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये फलटण १०, रविवार पेठ १२, बुधवार पेठ ७, सोमवार पेठ १, शुक्रवार पेठ २, तेली गल्ली १, जिंती नाका १, भीमनगर १, स्वामी विवेकानंद नगर १, सगुणामाता नगर १,मलटण ६, पवार गल्ली १, डेक्कन चौक १, भडकमकरनगर १, संजीवराजे नगर १, कसबा पेठ २, विद्यानगर १, बारस्कर गल्ली १, शंकर मार्केट १, धनगरवाडा १, लक्ष्मीनगर १, मारवाड पेठ १, शिवाजीनगर ४, नारळी बाग १, काळुबाईनगर ५, मेटकरी गल्ली १, व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. ग्रामीण भागात ८६ कोरोना पॉझिटिव्ह.
यामध्ये चौधरवाडी १, धुमाळवाडी १, माने मळा १, रावडी १, नाईकबोंमवाडी १, वडले १, तांबवे १, वाखरी १, अलगुडेवाडी ३, कोळकी ७, ठाकुरकी १, सासकल १, वाठार निंबाळकर ३, विडणी १, शेरेवाडी १, बोरावके वस्ती १, सस्तेवाडी १, चव्हाणवाडी १, हुमणगाव १, जिंती ४, तरडगाव ४, सासवड १, जाधववाडी ४, टाकुबाईचीवाडी १, काळज १, रेवडी खुर्द १, पाडेगाव २, सोमंथळी १, निरगुडी १, ढवळ १, विडणी १२, धुळदेव २, शिंदेवाडी १, राजाळे ३, मठाचीवाडी २, बरड २, गुणवरे १, निंभोरे १, सस्तेवाडी १, मिरगाव १, कुर्णेवाडी १, पिंप्रद १, कुसुर १, मुळीकवाडी १, गणेशनगर ३, फडतरवाडी १, कापडगाव १, वेळोशी १ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आहे.
एका बाधिताचा मृत्यू
फलटण येथील ४५ वर्षीय महिला कोरोना बाधिताचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.