डंगिरेवाडीत १५ वर्षांच्या सत्तेला सुरूंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:35 IST2021-01-21T04:35:44+5:302021-01-21T04:35:44+5:30

दहिवडी : डंगिरेवाडीत (ता. माण) येथे गेल्या १५ वर्षांपासून आमदार गोरे गटाच्या सत्तेला सुरूंग लावत बाळासाहेब जगदाळे यांच्या परिवर्तन ...

15 years in power in Dangirewadi | डंगिरेवाडीत १५ वर्षांच्या सत्तेला सुरूंग

डंगिरेवाडीत १५ वर्षांच्या सत्तेला सुरूंग

दहिवडी : डंगिरेवाडीत (ता. माण) येथे गेल्या १५ वर्षांपासून आमदार गोरे गटाच्या सत्तेला सुरूंग लावत बाळासाहेब जगदाळे यांच्या परिवर्तन पॅनेलने यश संपादन केले.

आमदार गोरे गटातील पंचायत समिती सदस्य हरिभाऊ जगदाळे यांच्या गटाला पराभव पत्करावा लागला. विजयाबद्दल ‘आमचं ठरलंय’चे नेते व मार्गदर्शक अनिल देसाई व बिदाल गटाचे नेते पिंटू जगदाळे यांनी नूतन सदस्यांचा सत्कार केला.

‘डंगिरेवाडीत ज्या प्रकारे परिवर्तन घडलं तसेच आता विकासाच्या बाबतीतही परिवर्तन घडवून गावाचा सर्वांगीण विकास साधावा, यासाठी लागेल ते सर्व सहकार्य आम्ही करू,’ असे आश्‍वासन अनिल देसाई यांनी दिले. विजयी सदस्य भामाबाई जगदाळे, गणपत मोरे, पूनम पवार, प्रकाश जगदाळे, सुवर्णा गिरी यांचे कौतुक केले.

यावेळी बाळासाहेब जगदाळे, छगन जगदाळे, सागर जगदाळे, विशाल पवार, विकास पवार, प्रवीण लकडे, बाळू जगदाळे, चंद्रकांत गोरे, प्रदीप गोरे, सुरेश देशमुख, अण्णा पवार, सर्जेराव जगदाळे, दौलत पवार, स्वप्निल जगदाळे, राकेश जगदाळे, संदीप पवार, राजेंद्र जगदाळे, जयवंत जगदाळे, आदी उपस्थित होते.

२०डांगिरेवाडी

डंगिरेवाडी (ता. माण) येथे निवडून आलेल्या नूतन सदस्यांचा अनिल देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: 15 years in power in Dangirewadi