शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

काँग्रेस महासंमेलनाला सातारा जिल्ह्यातून १५ हजार कार्यकर्ते जाणार : देसाई

By नितीन काळेल | Updated: December 18, 2023 18:11 IST

सातारा : राष्ट्रीय काँग्रेसला १३८ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने दि. २८ डिसेंबरला नागपूरला पक्षाचे महासंमेलन होत आहे. यामध्ये ...

सातारा : राष्ट्रीय काँग्रेसला १३८ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने दि. २८ डिसेंबरला नागपूरला पक्षाचे महासंमेलन होत आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील १५ हजार काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होण्यासाठी जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी दिली. येथील काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनोहर शिंदे, अॅड. श्रीकांत चव्हाण, निवास थोरात, धनश्री महाडिक, रजनी पवार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.नरेश देसाई म्हणाले, राष्ट्रीय काँग्रेसला एक परंपरा आहे. हा पक्ष आता २८ डिसेंबरला १३८ वर्षे पूर्ण करत आहे. यासाठी नागपूरला महासंमेलन होत आहे. याची पूर्ण तयारी होत आलेली आहे. या संमेलनाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, खासदार सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहूल गांधी हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर देश आणि राज्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्तेही सहभागी होतील. यासाठी सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एेक ते दोन हजार कार्यकर्ते नेण्याबद्दल नियोजन आहे. तरीही १५ हजार कार्यकर्ते निश्चित सहभागी होतील असा विश्वास आहे. तसेच नागपूरमधील मेळाव्यात राज्य आणि देशातून १० लाख कार्यकर्ते सहभागी होतील असाही अंदाज आहे.

पृश्वीराज चव्हाण यांना उमेदवारी..पत्रकार परिषदेत सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. युतीत सर्वच पक्ष मतदारसंघावर दावा करतात. तसेच आघाडीत तुम्ही सातारा मतदारसंघ लढविणार का ? असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर देसाई यांनी साताऱ्यात आघाडीची बैठक झाली. त्यावेळी पृश्वीराज चव्हाण यांना उमेदवारी द्यावी, अशी आम्ही मागणी केल्याचे सांगितले. तसेच आघाडीत उमेदवारीबाबत काय निर्णय होईल, त्याच्याशीही आम्ही प्रामाणिक राहू, असेही त्यांनी स्पष्टीकरण दिले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसnagpurनागपूर