‘कृष्णा’च्या रणांगणातून १५ जणांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST2021-06-16T04:51:27+5:302021-06-16T04:51:27+5:30

रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. सध्या अर्ज ...

15 retreat from the battlefield of 'Krishna' | ‘कृष्णा’च्या रणांगणातून १५ जणांची माघार

‘कृष्णा’च्या रणांगणातून १५ जणांची माघार

रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. सध्या अर्ज माघारीची प्रकिया सुरू आहे. मंगळवारी १५ जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. कृष्णाच्या रणांगणातून आजअखेर ३२ जणांनी माघार घेतली असून, १८१ अर्ज उरले आहेत. दरम्यान अर्ज मागे घेण्याची मुदत १७ जूनपर्यंत आहे.

मंगळवारी अर्ज माघार घेतलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे - वडगाव हेवी - दुशेरे गट- सुहास जगताप, नेर्ले-तांबवे गट - भिकू थोरात, अशोक मोरे, विक्रम चव्हाण, अनिल जगताप, रेठेरे हरणाक्ष-बोरगाव गट - रामाजी मोरे, छाया पाटील, रेठरे बुद्रूक-शेणोली गट - महेश कुलकर्णी, जयेश मोहिते, येडे मच्छिंद्र -वांगी गट - भीमराव पाटील, महिला राखीव गट - सावित्री पाटील, अर्चना मोहिते हेमलता निकम, शुभांगी निकम इतर मागास गट -महादू माळी.

Web Title: 15 retreat from the battlefield of 'Krishna'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.