शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

Satara: सणबूरमध्ये कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला; १५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 12:24 IST

नागरिकांची पळापळ : जखमींवर ढेबेवाडीतील ग्रामीण रुग्णालयात उपचार

पाटण (जि. सातारा) : येथील कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाच्या मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात कुस्ती मैदानातील पैलवानांसह १५ जण जखमी झाले, तर कुस्त्या पाहायला आलेल्या अनेकजणांना चावा घेतल्याने जखमी झाले. जखमींना ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सणबूर (ता. पाटण) येथील ग्रामदैवत श्री विठ्ठलाई देवीच्या यात्रेनिमित्त रविवार सायंकाळी आयोजित कुस्तीच्या मैदानावर आग्या मोहोळाच्या मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले. जखमींमध्ये पैलवानांसह, कुस्त्या पाहण्यास आलेले शौकीन तसेच यात्रेला आलेल्या महिला, लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे मैदान रद्द करून जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.यात्रेनिमित्त मुंबईकर मोठ्या संख्येने गावी आले आहेत. रविवारी सायंकाळी यात्रेनिमित्त शेतात कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. ५१ हजारांपासून ७५ हजार रुपयांपर्यंत बक्षिसे ठेवून काही मल्लांच्या लढतीही निश्चित केल्या होत्या. मैदान सुरू झाल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जवळच्याच झाडावर असलेल्या आग्या मोहोळाच्या पोळ्यातील मधमाश्या सैरभैर झाल्या आणि त्यांनी तेथे जमलेल्या लोकांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी बचावासाठी लोकांची पळापळ सुरू झाली.अनेकांच्या डोक्याला तसेच हातापायांना मधमाश्यांनी चावा घेतला. त्यामध्ये पैलवानासह यात्रेत आलेल्या महिला व बालकांचाही समावेश आहे. स्थानिक खासगी दवाखाने तसेच येथील ग्रामीण रुग्णालयात जखमींना दाखल करून उपचार करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. काहीजणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर काहींना ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले होते. या घटनेनंतर मैदान रद्द करण्यात आले आहे.

यात्रेच्या रंगाचा बेरंगसणबूर येथील विठ्ठलाई देवीच्या यात्रेनिमित्त परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यात्रेनिमित्त करमणुकीचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. मात्र, या घटनेमुळे यात्रेच्या रंगाचा बेरंग झाला. आग्या मोहोळाच्या माश्यांनी जखमी केलेल्यांना रात्री त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. बी. यादव यांनी दिली.

कुंभारगावातही हल्ला..विभागातील कुंभारगाव येथील श्री लक्ष्मीदेवी मंदिराच्या परिसरात रविवारी सायंकाळी आग्या मोहोळाच्या मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले. तेथे डीजेच्या दणक्याने मधमाश्यांचे पोळे तुटून खाली पडले आणि त्यामुळे चवताळलेल्या मधमाश्यांनी त्या परिसरात उपस्थित अनेकांचा चावा घेतल्याचे सांगण्यात येत आहे, तर जखमींनी रुग्णालयात उपचार घेतल्याचेही नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर