दीड लाखाची अवैध दारू जप्त; शहर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:40 IST2021-04-24T04:40:30+5:302021-04-24T04:40:30+5:30

सातारा : येथील राधिका रस्त्यावर रिक्षातून वाहतूक होत असलेल्या बेकायदा विदेशी दारूच्या बाटल्या शहर पोलिसांनी जप्त केल्या असून, ...

1.5 lakh worth of illicit liquor seized; City police action | दीड लाखाची अवैध दारू जप्त; शहर पोलिसांची कारवाई

दीड लाखाची अवैध दारू जप्त; शहर पोलिसांची कारवाई

सातारा : येथील राधिका रस्त्यावर रिक्षातून वाहतूक होत असलेल्या बेकायदा विदेशी दारूच्या बाटल्या शहर पोलिसांनी जप्त केल्या असून, याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी, दि. २२ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास येथील राधिका रस्त्यावरून रिक्षामधून विदेशी दारूची चोरटी वाहतूक सुरू होती. ही बाब पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ही रिक्षा पकडली.

या रिक्षामधून १ लाख ८३ हजार रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. लॉकडाऊन असताना अवैधरीत्या फिरणाऱ्या सोहेल अमीन इनामदार (वय २६, रा. लोणार गल्ली, रविवार पेठ, सातारा) व दीपक सर्जेराव मोरे (वय ४५, रा. आंबेदरे, ता. सातारा) यांना ताब्यात घेतले. या दोघांवर दारूची चोरटी वाहतूक व आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक फौजदार खंडागळे या गुन्हाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title: 1.5 lakh worth of illicit liquor seized; City police action