वाईतील १४ हजार रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:43 IST2021-09-06T04:43:50+5:302021-09-06T04:43:50+5:30
वाई : जिल्ह्यासह वाई तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या हळूहळू नियंत्रणात येऊ लागली आहे. तालुक्यात आजवर १३ हजार ९४३ रुग्णांनी ...

वाईतील १४ हजार रुग्ण कोरोनामुक्त
वाई : जिल्ह्यासह वाई तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या हळूहळू नियंत्रणात येऊ लागली आहे. तालुक्यात आजवर १३ हजार ९४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, २१२ रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यासाठी एप्रिल व मे हा महिना सर्वाधिक चिंतेचा ठरला. कारण या दोन महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले व सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला. यानंतर मात्र, रुग्णसंख्येचा आलेख खाली आला. वाई तालुक्यातही दररोज शंभराहून अधिक रुग्ण आढळून येत होते. मात्र, आरोग्य विभागाने केलेल्या उत्तम नियोजनामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे.
तालुक्यात आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोनाबाधितांपैकी तब्बल १३ हजार ९४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत तालुक्यातील विविध रुग्णालयांत २१२ रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, वाई पोलिसांकडून वेळोवेळी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात असून, नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी संदीप यादव यांनी केले आहे.