शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

‘आरटीओं’च्या तपासणी मोहिमेमधून १२ लाखांचा दंड वसूल; तब्बल २०९१ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2023 21:18 IST

अपघात रोखण्यासाठी विशेष मोहीम

सातारा : वाढते अपघात रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने १ ते १५ मार्च या कालावधीत जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविली. यामध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २०९१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल १२ लाख ६६ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली. 

अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग व इतर महामार्गावर तपासणी मोहीम राबिवण्यात आली. या विशेष तपासणी मोहिमेमध्ये या कार्यालयाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २०९१ दोषी वाहनांवर कारवाई केली. त्यामधून १२ लाख ६६ हजार ७५० इतका दंड वसूल करण्यात आला.

हेल्मेट - ७५४वाहन चालविताना मोबाइलचा वापर - २१३अति वेगाने चालणारी वाहने - ४९०सीटबेल्ट न लावणे - २१५चुकीच्या लेनमधून चालणारी वाहने - ३२धोकादायक पार्किंग - १६९ट्रीपल सीट - ५५विमा नसलेली वाहने - १३८पीयूसी नसलेली वाहने - ६३योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण नसलेली वाहने - ६५रिफ्लेक्टर/ टेल लॅम्प - २०

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी दोन फिरती पथके

या विशेष पथकाने खंडाळा, आनेवाडी टोल नाका या ठिकाणी पथके तैनात करून कारवाई केली. या शिवाय दोन फिरत्या पथकांमार्फत जिल्ह्यात होणाऱ्या अपघातस्थळी तातडीने भेट देण्यासाठी व अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संबंधित ठिकाणी पुन्हा अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना सुद्धा राबविण्यात येणार आहेत.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtraffic policeवाहतूक पोलीस