साताऱ्यातून १२ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:39 IST2019-04-04T23:39:54+5:302019-04-04T23:39:58+5:30
सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी १२ उमेदवारांनी २१ अर्ज दाखल केले आहेत. आज, शुक्रवारी उमेदवारी अर्जांची छाननी ...

साताऱ्यातून १२ उमेदवार रिंगणात
सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी १२ उमेदवारांनी २१ अर्ज दाखल केले आहेत. आज, शुक्रवारी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.
उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी), नरेंद्र पाटील, प्राची नरेंद्र पाटील (शिवसेना), पंजाबराव पाटील (बळीराजा शेतकरी संघटना), सहदेव ऐवळे (वंचित बहुजन आघाडी), आनंदा थोरवडे (बहुजन समाज पार्टी), दिलीप जगताप (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), सागर भिसे, शैलेंद्र वीर, किशोर धुमाळ, अभिजित बिचुकले (अपक्ष) या उमेदवारांचे अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासाठी डमी म्हणून आ. शशिकांत शिंदे यांनी तर शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांच्यासाठी डमी म्हणून डॉ. प्राची पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदार संघातील राष्ट्रवादी काँगे्रस विरुद्ध शिवसेना या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
शिंदे यांच्या अर्जामुळे चर्चेला उधाण
सातारा लोकसभा मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे यांनीही राष्ट्रवादीच्या वतीने एक व अपक्ष एक असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. खासदार उदयनराजे भोसले यांचा डमी म्हणून त्यांनी अर्ज दाखल केल्याचे राष्टÑवादीने सांगितले असले तरी कार्यकत्यांमध्ये मात्र उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. शुक्रवारी (दि. ५) उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर ८ तारखेला अर्ज माघारीची प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणुकीचे चित्र खऱ्या अर्थाने स्पष्ट होणार आहे.