स्वच्छतागृहाविना ११ हजार ८४७ कुटुंबे

By Admin | Updated: November 25, 2014 23:59 IST2014-11-25T22:06:04+5:302014-11-25T23:59:08+5:30

खटावमधील स्थिती : कुटुंबे दत्तक घेण्याचे आवाहन

11,487 households without sanitary toilets | स्वच्छतागृहाविना ११ हजार ८४७ कुटुंबे

स्वच्छतागृहाविना ११ हजार ८४७ कुटुंबे

खटाव : खटाव तालुक्यात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत १३३ गावातील ११ हजार ८४७ शौचालय नसलेल्या कुटुंबे आहेत. स्वच्छ भारत मिशन यशस्वी करण्यासाठी खटाव पंचायत समीतीच्या वतीने तालुक्यातील सर्व पदाधिकारी ,अधिकारी, व कर्मचारी यांना गावनिहाय कुटुंबे दत्तक देण्यात आली असल्याची माहीती सभापती प्रभावती चव्हाण, व गटविकास अधिकारी राहुल देसाई यांनी दिली.
खटाव तालुक्यात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय नसणाऱ्या कुटूंबांची जनजागृती त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी पंचायत समितीच्यावतीने युध्द पातळीवर कार्यक्रम राबवण्यास सुरवात झाली आहे. या साठी जि. प. पदाधिकारी यांनी स्वेच्छेने गाव दत्तक घेउन त्या गावाचे पालकत्व घेतले आहे. या मध्ये समाज कल्याण समिती सभापती जि.प. मानसिंगराव माळवे यांनी स्वच्छेने दत्तक घेतलेले गाव (वाझोंळी), महिला व बालकल्याण समिती सभापती कल्पना मोरे (निमसोड), वैशाली फडतरे (उांरमळे), शोभना गुदगे ( मायणी), अरुणा गोडसे ( गोपूज), सुनंदा राउत ( जायगाव), सावित्रा घाडगे (शिंदेवाडी) ही गावे दत्तक घेतली.
तालुक्यातील १३३ गावात या स्वच्छ भारत अभियानासाठी ८७ ग्रामविकास अधिकारी, ५२ तलाठी, ८0७ प्राथमिक शिक्षक, ४२0 आंगणवाडी सेवीका, ३८ आरोग्य सेवक, ४३ आरोग्य सेविका, ४६१ माध्यमिक, व उच्च माध्यमिक शिक्षक असे एकुण १९0८ कर्मचारी कामाला लागले आहेत. यात प्रत्येक नियुक्त केलेल्या पदाधिकारी, तसेच कर्मचारी यांनी २५ कुटूंबांना गृहभेटी देऊन त्यापैकी ९ कुटूंबे दत्तक घेउन त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करावयाचे आहे.
आपला गाव स्वच्छ भारत अभियान मध्ये कशा रितीने अग्रेसर ठेवता येईल यादृष्टीने सहकार्य करावे असे आहवान ही सभापती प्रभावती चव्हाण, तसेच उपसभापती धनाजी पावसे यांनी केले आहे. (वार्ताहर)

शौचालय बांधल्यानंतर बारा हजार रुपये अनुदान
या अभियान अंतर्गत शौचालय बांधल्यानंतर सर्व्हेत नाव असल्यास १२ हजार अनुदान मिळणार आहे. स्वच्छ भारत अभियान, तसेच आपला गाव स्वच्छ गाव हा नारा घेउन गाव तसेच वाड्या वस्त्यावर पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य, तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे काम सुरु झाले आहे. हे काम प्रभावी पणे करण्यासाठी त्यांच्या कामात लोकसहभागही असणे अत्यंत महत्वाचे आहे.

Web Title: 11,487 households without sanitary toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.