जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यात ११०.५० कोटींची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:38 IST2021-02-13T04:38:16+5:302021-02-13T04:38:16+5:30

सातारा : सातारा जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना २०२१-२२ मूळ २६४ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यात ११०.५० कोटी वाढ करून ...

110.50 crore increase in the annual plan of the district | जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यात ११०.५० कोटींची वाढ

जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यात ११०.५० कोटींची वाढ

सातारा : सातारा जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना २०२१-२२ मूळ २६४ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यात ११०.५० कोटी वाढ करून ३७५ कोटी रुपयांच्या निधीच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती देऊन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून सातारा शहरात सैनिक स्कूल सुरु झाले आहे. या सैनिक स्कूलचा राज्यासह देशात नावलौकिक वाढावा, यासाठी येथील इमारती व इतर कामांसाठी वेगळ्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल, अशी ग्वाहीही वित्त व नियोजन तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

जिल्हा वार्षिक योजना २०२१/२२ (सर्वसाधारण) राज्यस्तरीय बैठक विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन पुणे येथे वित्त व नियोजन तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला सहकार व पणन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, अतिरिक्त मुख्य सचिव देबाशीश चक्रवर्ती, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यात वन विभागाने फॅगोडाचे काम अतिशय उत्तम करावे, असे सांगून उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, आतापर्यंत वन विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी वेळोवेळी वृक्षारोपण करण्यात आले आहे. हे वृक्ष जगविण्यासाठी मनरेगाचा निधी वापरावा. स्मशानभूमीतील पत्र्यांचे शेड हे वारा, पाऊस व ज्वालामुळे खराब होऊ शकतात त्यामुळे स्मशानभूमीतील शेड कायमस्वरुपी रहावे यासाठी सिमेंट क्राँक्रीटचे स्लॅब टाकावे, अशाही त्यांनी बैठकीत सूचना केल्या.

सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाबतीत प्रत्येक १५ दिवसांनी वरिष्ठस्तरावर बैठक घेण्यात येत आहे. या महाविद्यालयाच्या कृष्णानगर येथील जागेवर अतिक्रमण होणार नाही तसेच तेथील झाडे तोडली जाणार नाहीत यावर लक्ष द्या, असे कोणी केल्याचे आढळले तर त्यावर कडक कारवाई करावी. याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावे तसेच पालकमंत्री यांनी वेळोवेळी भेटी देऊन आढावा घ्यावा अशी सूचनाही केली.

चौकट

सातारा येथील सैनिक स्कूलसाठी निधी

पर्यटनाला चालना देण्यासाठी महाबळेश्वरचा विकास, राज्यासह देशात सातारा सैनिक स्कूलचा नावलौकिक वाढावा यासाठी इमारत, इतर सुविधा व सुशोभीकरणासाठी तसेच शासकीय विश्रामगृहात देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात येणार असल्याचेही वित्त व नियोजन तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत सांगितले. यावेळी आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे यांनी विकासाबाबत मुद्दे उपस्थित केले.

फोटो नेम : १२कलेक्टर

फोटो ओळ : पुणे येथील विभागीय कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.

Web Title: 110.50 crore increase in the annual plan of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.