नियम मोडणाऱ्यांकडून ११ लाख वसूल

By Admin | Updated: November 9, 2014 23:27 IST2014-11-09T22:38:51+5:302014-11-09T23:27:57+5:30

बांधकाम जैसे थे : दंड भरूनही उपरती नाही; पालिकेच्या नोटीशीकडे अनेकांचा कानाडोळा

11 lakh recovered from breaking rules | नियम मोडणाऱ्यांकडून ११ लाख वसूल

नियम मोडणाऱ्यांकडून ११ लाख वसूल

दत्ता यादव -सातारा -वारंवार नोटीस देवूनही अवैध बांधकामे आणि अतिक्रमणे हटविण्यात पालिका प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे. केवळ दंडात्मक कारवाई करून पालिकेची तिजोरी भरण्यात आली. परंतु अतिक्रमणे आणि अवैध बांधकामे अद्यापही जैसे थे च आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये अवैध बांधकाम आणि अतिक्रमण करणाऱ्यांकडून तब्बल ११ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.
पालिका प्रशासनाने नोटीसीद्वारे तंबी दिल्यानंतर काहींनी तत्काळ पालिकेत येऊन शास्ती (दंड) भरली. परंतु अद्यापही काहींनी पालिकेच्या नोटीसीकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्याचे कारण म्हणजे त्या-त्या वॉर्डमधील नगरसेवक आणि राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे काहींनी दंडही भरला नाही. असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. काही नागरिकांना सात ते आठवेळा नोटीसा पाठवूनही त्यांच्यावर काहीच फरक पडला नाही. आपण नियम मोडला आहे, हे मान्य केल्यामुळेच काहींनी पालिकेत येऊन दंडाचे पैसे भरले. अतिक्रमण मात्र स्वत: काढून घेतले नाही. पालिका प्रशासन ज्या वेळी अतिक्रमण काढेल, तेव्हा पाहू, असे म्हणून काहीजण पालिकेच्या नोटीसेला दाद देत नाहीत. परंतु अतिक्रमण मोहिम प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर मध्यस्थीसाठी मग अशा लोकांची धावाधाव सुरू होते. यदाकदाचीत अतिक्रमण निघालेच तर पुन्हा दोन दिवसांत बांधकाम जैसे थे झाल्याचे आपल्याला पहायला मिळते. मात्र अशा लोकांवर काहीच कारवाई होत नाही. त्यामुळे केवळ दंड भरून नामानिराळे राहाणारे हे लोक पालिकेला ठेंगा दाखविण्यात चांगलेच सरावल्याची चर्चा आहे. (समाप्त)

बड्या हस्तींची अतिक्रमणे...
शहरात सध्या जी अतिक्रमणे आहेत ती बड्या हस्तींची आहेत. त्यामुळे पालिका तोंड पाहून अतिक्रमण काढणार की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी केलेल्या सुचनेला पालिका प्रशासन कशाप्रकारे प्रतिसाद देतेय, हे आता अतिक्रम मोहिम सुरू झाल्यानंतर सातारकरांना पाहिला मिळणार आहे.

यांच्या बांधकामावरही अद्याप पालिकेचा आशीर्वाद
नानाजी बाजीराव जाधव (माची पेठ)
दि युनियन लायब्ररी सातारा (शनिवार पेठ)
अस्लम हाशमभाई तांबोळी (मल्हार पेठ)
प्रशांत शंकरराव काकडे (भवानी पेठ)
शिवाजी कृष्णा जेबले (गुरूवार पेठ)
शोभा विलास सारखे (शनिवार पेठ)
खंडेकर गणपत शिंदे
(शुक्रवार पेठ)
धनंजय ल. काळे (गोडोली)
मधूकर लखन काळे (गोडोली)
विजया राजन काळे (गोडोली)
विलास खाशाबा माने (शनिवार पेठ)
अर्जुनराव घोरपडे (रविवार पेठ)
श्रीरंग काशीनाथ साळुंखे (बुधवार पेठ)
अनुसया अंकूश भिंगारदेवे (मल्हार पेठ)
परशुराम गोविंद खेर (शुक्रवार पेठ)
लक्ष्मण कृष्ण बाबर (करंजे पेठ)
बाबासाहेब नामदेव गोरे तर्फे युवराज शिंदे (बुधवार पेठ)
बबन पिराजी गाडे (गोडोली)
जहांगीर इब्राहिम इनामदार
(भवानी पेठ)
दिलीप प्रल्हाद निगडकर (सोमवार पेठ)
संजय बाळकृष्ण चिंचकर (मल्हार पेठ)
तानाजी बनसी बडेकर
(शनिवार पेठ)
बाळू दिगंबर पवार
(माची पेठ)
खुदबुद्दीन चतूर कुरेशी (रामाचा गोट)
विठ्ठल देव तर्फे विठ्ठल बाबूराव वारंग (मंगळवार पेठ)
जनता सहकारी बँक (भवानी पेठ)
राधेश्याम लक्ष्मण हादगे (पंताचा गोट)
कुसूम मोहन शिवदास तर्फे विशाल मोहन शिवदास (पंताचा गोट )
सुमन भिमराव घाडगे (पंताचा गोट)

Web Title: 11 lakh recovered from breaking rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.