कऱ्हाड परिसरात १०८ जणांचं मरण ‘बेवारस’ : नदीपात्रात, महामार्गावर, रस्त्याकडेला, फूटपाथवर आढळले मृतदेह; पालिकेने केले अंत्यसंस्कार

By Admin | Updated: April 30, 2015 00:25 IST2015-04-29T23:26:05+5:302015-04-30T00:25:15+5:30

जानेवारी २००९ ते मार्च २०१५ अखेर कऱ्हाड शहर परिसरात पोलिसांना १०८ बेवारस मृतदेह आढळून आले आहेत.

108 people died in Karhad area, 'unprovoked': bodies found on river banks, highways, roads, widows; Municipal corporation's funeral | कऱ्हाड परिसरात १०८ जणांचं मरण ‘बेवारस’ : नदीपात्रात, महामार्गावर, रस्त्याकडेला, फूटपाथवर आढळले मृतदेह; पालिकेने केले अंत्यसंस्कार

कऱ्हाड परिसरात १०८ जणांचं मरण ‘बेवारस’ : नदीपात्रात, महामार्गावर, रस्त्याकडेला, फूटपाथवर आढळले मृतदेह; पालिकेने केले अंत्यसंस्कार

संजय पाटील - कऱ्हाड  -मरणाची कुणी वाट पाहत नाही; पण ते आलंच तर टाळताही येत नाही, असं म्हणतात. आयुष्याला कंटाळत उद्विग्न होऊन एखादा मरण यावं, असं म्हणेलही. आत्महत्या करीत स्वत:हून मरणाला काहीजण जवळ करतीलही. मात्र, आपलं मरण बेवारस असावं, असं कुणालाच वाटणार नाही. कऱ्हाड परिसरात मात्र १०८ जणांनी असं मरण स्वीकारलय. नुसतं मरणच नव्हे, तर त्यानंतर आजतागायत त्यांच्या चिजवस्तूंनाही वारस मिळालेला नाही. पोलीस ठाण्याच्या दप्तरी फक्त ‘बेवारस’ असंच त्याचं नामकरण झालंय.कऱ्हाडनजीक महामार्गावर अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचा मृतदेह अनेक वाहनांनी चिरडल्याची घटना घडली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने सारेच सुन्न झाले. संबंधिताची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, गत काही वर्षांत अशा अनेकांनी बेवारस म्हणूनच मरण स्वीकारलंय. कवेत घेताना मृत्यू खूप यातना देतो, असं म्हणतात; पण ज्यांनी बेवारस म्हणून मरण स्वीकारलंय त्यांच्या यातना कधी कुणालाच कळणार नाहीत. ज्यावेळी त्यांना मृत्यूनं गाठलं, त्यावेळी ते एकटे होते. कदाचित वारस असूनही त्यावेळी ते बेवारस होते आणि आता मृत्यूनंतरही पोलीस दप्तरी ते ‘बेवारस’च राहिलेत. कऱ्हाड शहरासह परिसरामध्ये गत पाच वर्षांच्या कालावधीत १०८ बेवारस मृतदेह आढळून आले आहेत.
या मृतदेहांवर पालिकेने अंत्यसंस्कारही केले; पण अद्यापही त्यांची ओळख पटलेली नाही. पंचनामा करताना संबंधितांजवळ सापडलेले काही साहित्य व कपडे पोलिसांनी मुद्देमाल कक्षात जमा केले आहेत. मात्र, ते जमा करताना कपड्यांवरही ‘बेवारस मयत’ अशीच नोंद करण्यात आली आहे. शहर परिसरात बेवारस स्थितीत सापडलेला मृतदेह पोलिसांमार्फत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येतो. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून तो मृतदेह शीतगृहात ठेवण्यात येतो.
उपजिल्हा रुग्णालयात तीन ते सात दिवस मृतदेह सुस्थितीत राहू शकेल, अशा क्षमतेचे शीतगृह आहे. मृतदेह त्याठिकाणी ठेवण्यात आल्यानंतर काही दिवस संबंधिताच्या नातेवाइकाची वाट पाहण्यात येते. नातेवाईक आलेच, तर तो मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात येतो अथवा पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत अंत्यसंस्कार करण्यात येतात.
जानेवारी २००९ ते मार्च २०१५ अखेर कऱ्हाड शहर परिसरात पोलिसांना १०८ बेवारस मृतदेह आढळून आले आहेत.
कृष्णा, कोयना नदीपात्रात, महामार्गावर, रस्त्याकडेला अथवा एखाद्या पदपथावर आढळून आलेल्या या मृतदेहांची जबाबदारी प्रथमत: कऱ्हाड पोलिसांनी स्वीकारली. त्यांनी पंचनामा करून संबंधित मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.
नेहमीच्या कार्यवाहीप्रमाणे संबंधित मृतदेहांवर पालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले व साहित्य, कपडे पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात जमा करण्यात आले.
गत सहा वर्षांत ज्या १०८ जणांचे मृतदेह बेवारस स्थितीत आढळले त्यांना वारस नव्हतेच, हे खात्रीशिरपणे सांगता येत नाही. मात्र, मृत्यूनंतरही
ते बेवारसच राहिले, हे मात्र
निश्चित..!


कसा ओढवतो मृत्यू..?
पोलिसांना आढळलेल्या बेवारस मृतदेहांपैकी बहुतांश जणांचा मृत्यू प्रदीर्घ आजार व अशक्तपणामुळे झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे.
काही जणांचा मृत्यू संशयास्पद असतो; मात्र संबंधिताची ओळखच पटली नसल्याने त्याबाबत तक्रार होत नाही. परिणामी, पोलिसांनाही तपासाला पुढील दिशा मिळत नाही. अखेर तपास थंडावतो.
काही ठिकाणी अपघात होऊन मृत्युमुखी पडलेल्याची ओळख पटत नाही. महामार्गावर असे अपघातातील बेवारस मृतदेह अनेकवेळा आढळून येतात. कधी-कधी त्यांची ओळख पटते; मात्र काहीजण फिरस्ते असल्याने त्यांची ओळखच पटत नाही.
नदीपात्रात आढळून येणाऱ्या मृतदेहांची अनेकवेळा ओळख पटत नाही. मृतदेह जास्त दिवस पाण्यात असल्यास त्याची ओळख पटविण्यात पोलिसांना अडचणी येतात. तसेच मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूही वाहत्या पाण्यामुळे राहत नाहीत.
बेवारस स्थितीत आढळून येणाऱ्या मृतदेहांमध्ये पुरुषांच्या मृतदेहाची संख्या जास्त असल्याचे आजपर्यंतच्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. महिलेचा बेवारस मृतदेह आढळून आल्याच्या घटना हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहेत.



ओळख पटविण्यासाठी
होतात प्रयत्न

बेवारस मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जातात. ओळख पटली नाहीच, तर त्या ठिकाणचा पंचनामा करून मृतदेहाचे कपडे, बोटाचे ठसे, छायाचित्र, अंगावरील वस्तू ओळख पटविण्यासाठी ठेवण्यात येतात. तसेच संबंधिताच्या अंगावर जन्मत: असलेल्या खुणा, गोंदण आदीची माहितीही पोलिसांकडून संकलित केली जाते. संबंधित वस्तू, माहिती व मृतदेहाचे छायाचित्र पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्षात अंतिम निर्गती होईपर्यंत जपून ठेवले जाते.

बेवारस आढळलेले मृतदेह
वर्षस्त्रीपुरूषएकुण
२००९०४१६२०
२०१००५१७२२
२०११०२०६०८
२०१२०५१११६
२०१३०४१४१८
२०१४०९०९१८
२०१५ (मार्च)०२०४०६

Web Title: 108 people died in Karhad area, 'unprovoked': bodies found on river banks, highways, roads, widows; Municipal corporation's funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.