शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Satara ZP Election 2026: उमेदवारी अर्जांचा पाऊस; गटांसाठी ६३२, गणांसाठी १०५९ अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 14:39 IST

कराड तालुक्यातून सर्वाधिक उमेदवार रिंगणात

सातारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, दोन्ही निवडणुकांसाठी एकूण १ हजार ६९१ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या ६५ गटांसाठी ६३२ तर पंचायत समितीच्या १३० गणांसाठी १ हजार ५९ नामनिर्देशनपत्रे भरली आहेत. गट आणि गणांसाठी सर्वाधिक अर्ज हे कराड तालुक्यातून सादर झाले आहेत.सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि ११ तालुक्यांतील पंचायत समितीच्या १३० गणांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजप, दोन्ही राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिंदेसेना, काॅंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर पक्षही रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी बुधवार, दि. २१ हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. या मुदतीत पंचायत समिती गणांसाठी १ हजार ५९ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. तर जिल्हा परिषद गटांसाठी ६३२ नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली. त्यामुळे या निवडणुकीत अधिक संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन गट असून, यासाठी १६ नामनिर्देशनपत्रे दाखल आहेत. वाई तालुक्यात चार गटांसाठी ३६, खंडाळ्यात तीन गटांसाठी ५१ अर्ज दाखल झाले आहेत. फलटणला आठ गटांसाठी ६४, माणच्या पाच गटांसाठी ४०, खटावला सात गटांसाठी ६३, कोरेगाव तालुक्यात सहा गटांसाठी ५३, सातारा तालुक्यातील आठ गटांसाठी ९५ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. त्याचबरोबर जावळी तालुक्यात तीन गटांसाठी ३२, पाटणला सात गटांसाठी ५० आणि कराड तालुक्यातील १२ गटांसाठी १३२ नामनिर्देशनपत्रे दाखल आहेत.पंचायत समित्यांचे १३० गण आहेत. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील चार गणांसाठी ३४ नामनिर्देशनपत्रे दाखल आहेत. वाईतील आठ गणांसाठी ४५, खंडाळा तालुक्यात सहा गणांसाठी ७१, फलटणला १६ गणांसाठी ११९ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. माण तालुक्यात १० गणांसाठी ८७, खटावला १४ गणांसाठी ११२, कोरेगावला १२ गणांसाठी ९४, सातारा तालुक्यातील १६ गणांसाठी तब्बल १४३ नामनिर्देशनपत्रे दाखल आहेत. त्याचबरोबर जावळी तालुक्यात सहा गणांसाठी ५८, पाटणला १४ गणांसाठी ९२ आणि कराड तालुक्यात २४ गणांसाठी २०४ अर्ज दाखल झाले आहेत.

कराडला गट अन् गणांसाठी ३३६ नामनिर्देशनपत्रे...जिल्ह्यात कराड तालुक्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठी सर्वाधिक ३३६ नामनिर्देशनपत्रे दाखल आहेत. महाबळेश्वर तालुक्यात एकूण ५०, वाई तालुक्यात ८१, खंडाळा तालुक्यात १२२, फलटणला १८३, माण तालुक्यात १२७, खटावला १७५, कोरेगाव तालुक्यात १४७, सातारा २३८, जावळी ९०, पाटण तालुक्यात १४२ नामनिर्देशनपत्रे दाखल आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara ZP Election 2026: Nomination filings surge for council and committee.

Web Summary : Satara Zilla Parishad election sees a flood of nominations: 632 for ZP groups and 1059 for Panchayat Samiti. Karad leads in filings.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Satara areaसातारा परिसरKaradकराडPoliticsराजकारण