शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेतून १०५० क्युसेक विसर्ग, १०२ टीएमसी साठा : धोम, उरमोडीतील आवक थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 13:59 IST

अनेक दिवसांनंतर कोयना धरण परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली असून २४ तासांत ३५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर धरणात १०२ टीएमसी साठा असून पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे धोम आणि उरमोडी धरणात पाण्याची आवक बंद झाली आहे.

ठळक मुद्देकोयनेतून १०५० क्युसेक विसर्ग, १०२ टीएमसी साठा धोम, उरमोडीतील आवक थांबली

सातारा : अनेक दिवसांनंतर कोयना धरण परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली असून २४ तासांत ३५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर धरणात १०२ टीएमसी साठा असून पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे धोम आणि उरमोडी धरणात पाण्याची आवक बंद झाली आहे.गेल्या दहा दिवसांपासून पश्चिम भागात पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे धरणात पाण्याची आवक मंदावली आहे. मात्र, रविवारी काही भागात पुन्हा पाऊस झाला. कोयना धरणात सध्या २७५६ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर कण्हेरमध्ये ९.८७ टीएमसी साठा असून १०२ क्युसेक पाणी येत आहे. सध्या या धरणात ९७.७२ टक्के पाणीसाठा झाला आहे.बलकवडीत ४.०२ टीएमसी साठा असून टक्केवारी ९८.६२ आहे. उरमोडीत ९.५१ टीएमसी पाणीसाठा असून पाण्याची आवक थांबली आहे. तर डाव्या कालव्यातून ४५० क्युसेक पाणी सिंचनासाठी सोडण्यात येऊ लागले आहे.

तारळी परिसरात एक मिलीमीटर पाऊस झाला असून ५० क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर धरणाचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या माण, खटाव, फलटण या तालुक्यात रविवारी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसरDamधरण