शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सातारा जिल्ह्यातील १०० गावांचं पाऊल प्लास्टिक कचरामुक्तीकडे

By नितीन काळेल | Updated: December 11, 2023 19:06 IST

जिल्हा परिषदेचा पुढाकार; गावांचं बकालपण जाणार

सातारा : कचरा न संपणारी गोष्ट आहे. शहराप्रमाणचे ग्रामीण भागातही कचऱ्याची समस्या आहे. त्याचबरोबर प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढत असल्याने गावांना बकाल रुप येत आहे. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने १०० गावांची प्रायोगिक तत्वावर निवड करुन प्लास्टिकमुक्तीकडे पाऊल टाकले आहे. त्यामुळे भविष्यात याचे सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत.

कचरा हा आरोग्यासाठी घातकच. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट योग्य पध्दतीने लावावी लागते. शहराच्या ठिकाणी घंटागाडीतून कचरा नेण्यात येतो. पण, प्लास्टिक कचऱ्याची समस्या आहेच. कारण, शहरातील रस्त्यांच्या बाजुने पाहिले तर सर्वत्र प्लास्टिकच दिसून येते. तर ग्रामीण भागात ओला आणि सुका कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित होत नाही हेही वास्तव आहे. त्यातच प्लास्टिकने गावांना बकालरुप येत आहे. रस्ते असो किंवा ओढे, नाले, नद्या अशा ठिकाणी प्लास्टिक कचराच दिसतो. या कचऱ्याचे वर्गीकरणच होत नाही. त्यामुळे गावांना बकालपण येत आहे. हे बकालपण टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने पुढाकार घेतला आहे.ग्रामपंचायतींना १५ वा वित्त आयोग तसेच विविध याेजनांतून निधी मिळतो. त्यामुळे ग्रामपंचायतींचीही जबाबदारी लोकांना सुविधा पुरविण्याची आहे. त्यामुळे आता प्लास्टिक कचऱ्याची समस्या टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनाही एक पाऊल उचलावे लागत आहे. यासाठी ग्रामस्थांनी घरातील प्लास्टिक उंबऱ्या बाहेर येऊ नये यासाठी दक्षता घ्यायची आहे. घरातच प्लास्टिक गोळा करुन ठेवायचे आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीने आठवड्यातून एकदातरी घरातील प्लास्टिक जमा करणे आवश्यक आहे.नंतर या प्लास्टिक कचऱ्यावर पुर्नप्रक्रिया करुन ते पुन्हा वापरात कसे येईल, हे पाहिले जाणार आहे. अशाप्रकारे प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यात १०० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आलेली आहे. यामुळे गावातील प्लास्टिक कचऱ्यांचे ढिगारे कमी होणार आहेत. तसेच कोठेही प्लास्टिक दिसणार नाही. त्यामुळे गावाचे बकालपणही जाण्यास मदत होणार आहे. या सर्व प्रक्रियेत ग्रामपंचायतींची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे.

यावर चालणार काम..

प्लास्टिक मुक्तीसाठी १०० ग्रामपंचायतींची निवड झालेली आहे. यामध्ये त्रिसुत्रीचा वापर केला जाणार आहे. प्लास्टिकचा वापर कमी करणे, त्याचा पुन्हा वापर करणे आणि प्लास्टिकवर पुर्नप्रक्रिया ही त्रिसुत्री राहणार आहे.

आपले गाव स्वच्छ आणि सुंदर असणे महत्वाचे असते. यासाठी कचरामुक्त गाव ठेवण्याची गरज आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे तर गावांचे साैंदर्य हरवतं. यासाठी प्लास्टिक कचरा उघड्यावर पडू नये यासाठी जिल्ह्यातील १०० गावांची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये ग्रामस्थांनी प्लास्टिक घरात गोळा करायचे आहे. त्यानंतर ग्रामपंचायती प्लास्टिक जमा करुन ते पुढील पुर्नप्रक्रियेससाठी पाठवतील. यामुळे गावे कचरामुक्त होतील. - अर्चना वाघमळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPlastic banप्लॅस्टिक बंदीzpजिल्हा परिषद