शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

Satara: कोयना धरणात १०० टीएमसी पाणीसाठा; पायथा वीजगृहातून पाणी सोडले, कण्हेर, उरमोडीतूनही विसर्ग 

By नितीन काळेल | Updated: August 27, 2024 12:27 IST

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून कोयना धरणातील पाणीपातळीही १०० टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. ...

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून कोयना धरणातील पाणीपातळीही १०० टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढल्याने धरणाच्या पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील कण्हेर, धोम, उरमोडी धरणातूनही पाणी विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे.जिल्ह्यात आॅगस्ट महिना सुरू झाल्यानंतर पाऊस कमी झाला होता. तर आॅगस्टच्या मध्यावर पावसाने काही दिवस विश्रांती घेतलेली. मात्र, मागील पाच दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. २९ आॅगस्टपर्यंत जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मागील पाच दिवसांत तर जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस होत आहे. कोयना, नवजा, कास, तापोळा, बामणोली, महाबळेश्वर या भागात संततधार आहे. त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर पश्चिमेकडील कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडीसह तारळी धरण पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे.

मंगळवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १३६ तर नवजाला १३९ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तसेच महाबळेश्वरला १४२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक टिकून आहे. सकाळच्या सुमारास ३८ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरण पाणीसाठ्यात वाढ झाली. ९८.८९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. सायंकाळपर्यंत धरणसाठा १०० टीएमसीचा टप्पा पार करु शकतो. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळी ११ पासून कोयना धरणातील पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू करुन २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्याबाबत निर्णय झाला होता. परिणामी कोयना नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढणार असल्याने नदीकाठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

धरणांमधून पुन्हा पाणी सोडले; नदीकाठी इशारा..कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील व पुणे जिल्ह्यातील वीर धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरूच आहे. यामुळे धरणात आवक वाढल्याने वीरमधून नीरा नदीपात्रात ४७ हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. 

उरमोडी धरणातही पाणीसाठा वाढला. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून दरवाजातूनही सुमारे सहा हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आले. तर धरणाच्या वीजगृहातून ५०० क्यूसेक विसर्ग सुरूच आहे. तर कण्हेर धरणातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे. यामुळे दरवाजातून विसर्ग वाढविण्यात आलेला आहे. धरणांमधून पाणी सोडण्यात येत असल्याने कोयना, नीरा, उरमोडी आणि वेण्णा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण