शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील प्रमुख चार धरणांत १०० टक्के साठा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 16:52 IST

koyna, dam, sataranews सातारा जिल्ह्यात यावर्षीही चांगला आणि सतत पाऊस झाल्याने सर्वच धरणे, तलाव भरले आहेत. तर सद्य:स्थिती प्रमुख सहा धरणांमध्ये १४८ टीएमसीवर पाणीसाठा आहे. यामधील चार धरणांमध्ये तर १०० टक्के पाणीसाठा टिकून आले.

ठळक मुद्देचांगल्या पावसाचा परिणाम सहा धरणांमध्ये १४८ टीएमसीवर पाणी

सातारा : जिल्ह्यात यावर्षीही चांगला आणि सतत पाऊस झाल्याने सर्वच धरणे, तलाव भरले आहेत. तर सद्य:स्थिती प्रमुख सहा धरणांमध्ये १४८ टीएमसीवर पाणीसाठा आहे. यामधील चार धरणांमध्ये तर १०० टक्के पाणीसाठा टिकून आले.जिल्ह्यात गेल्यावर्षी पाच महिने पाऊस झाला होता. सततच्या व धुवाँधार पावसामुळे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील प्रमुख धरणे फुल्ल झाली होती. यावर्षी मात्र, धरणे उशिरा भरली. तर यंदा जून महिन्यात मान्सूनच्या पावसालाही वेळेवर सुरुवात झाली. काही दिवस धुवाँधार पाऊस पडला. त्यामुळे धरणांमध्येही वेगाने पाणीसाठा वाढू लागला. पण, त्यानंतर पावसाने उघडीप घेतली. जुलै महिन्यात तर कमी प्रमाणात पाऊस झाला. परिणामी धरणे भरणार का अशी चिंताही निर्माण झाली होती. पण, ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून चांगला पाऊस होण्यास सुरुवात झाली.पश्चिम भागात तर काही दिवस धुवाँधार पाऊस पडला. यामुळे कोयना, धोम-बलकवडी, उरमोडी, कण्हेर, तारळीसारख्या धरणांत वेगाने पाणीसाठा वाढला. त्यातच पाऊस सुरू असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला होता. तर यावर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरणात पाणीसाठा टिकून आहे.जिल्ह्यात कोयना, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी आणि तारळी या प्रमख सहा धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. सद्य:स्थितीत या धरणांमध्ये १४८.०६ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. त्यातच यातील कण्हेर, धोम, उरमोडी आणि तारळी या धरणांत किरकोळ स्वरुपात पाण्याची आवक होत आहे. तसेच अद्यापही सिंचनासाठी धरणांमधून पाणी सोडण्यात आलेले नाही. मात्र, पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी उरमोडीच्या पॉवर हाऊसमधून नदीपात्रात २०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, खटाव तालुक्यातील येरळवाडी धरणही पूर्ण भरलेले आहे. सध्या सांडव्यातून नदीत ४७१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा साठा (टीएमसीमध्ये)धरणे         सध्या      टक्केवारी      एकूण क्षमता

  • धोम          १३.५०      १००     १३.५०
  • कण्हेर        १०.१०     १००    १०.१०
  • कोयना      १०४.६१  ९९.३६    १०५.२५
  • बलकवडी      ४.०८     १००         ४.०८
  • उरमोडी          ९.९६    १००        ९.९६
  • तारळी             ५.८१    ९९. ३०    ५.८५
टॅग्स :DamधरणSatara areaसातारा परिसर