१०० नागरिक मृत्यूच्या सावटाखाली

By Admin | Updated: August 6, 2015 00:39 IST2015-08-06T00:39:14+5:302015-08-06T00:39:14+5:30

औरंगाबाद : ठाणे येथील बी केबिन परिसरात मंगळवारी धोकादायक इमारत कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर औरंगाबादेतीलही

100 civil servants die in death | १०० नागरिक मृत्यूच्या सावटाखाली

१०० नागरिक मृत्यूच्या सावटाखाली


औरंगाबाद : ठाणे येथील बी केबिन परिसरात मंगळवारी धोकादायक इमारत कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर औरंगाबादेतीलही धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून, १५ अत्यंत धोकादायक असलेल्या इमारतींमध्ये १०० पेक्षा अधिक नागरिक बिनधास्तपणे राहत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेने बुधवारी सहा इमारतींना सील ठोकले.
जुन्या औरंगाबाद शहरात ७५ पेक्षा अधिक धोकादायक इमारती आहेत. वॉर्ड ‘अ’ कार्यालयांतर्गत १४ तर वॉर्ड ‘ड’ अंतर्गत ११ इमारती सर्वाधिक धोकादायक आहेत. या इमारती कोणत्याहीक्षणी कोसळू शकतात, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. यातील काही इमारतींमध्ये घरमालक आणि भाडेकरूंचा पन्नास वर्षांपासूनचा वाद आहे. भाडेकरू ताबा सोडण्यासाठी तयार नाहीत. घरमालक इमारत पाडा, असा मनपाकडे आग्रह धरतो, पण भाडेकरू कोणत्याही परिस्थितीत जागा देण्यास तयार नाहीत. जागेचा हक्क जाऊ नये म्हणून अनेक जण धोकादायक इमारतींमध्ये राजरोसपणे राहत आहेत.
मृत्यूच्या सावटाखाली राहणाऱ्या नागरिकांची संख्या १०० पेक्षा अधिक असल्याचे मनपाच्या सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. या नागरिकांना मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने अनेकदा समजावून सांगितले तरी ते ऐकण्याच्या

Web Title: 100 civil servants die in death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.