शामगावला १० बेडचे कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:28 IST2021-05-31T04:28:10+5:302021-05-31T04:28:10+5:30

शामगाव : शामगाव (ता. कऱ्हाड) येथे दहा बेडचे कोविड सेंटर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सुरू करण्यात ...

10 bed covid center at Shamgaon | शामगावला १० बेडचे कोविड सेंटर

शामगावला १० बेडचे कोविड सेंटर

शामगाव : शामगाव (ता. कऱ्हाड) येथे दहा बेडचे कोविड सेंटर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.

सध्या सुरू असलेल्या कोविड या संसर्गजन्य रोगाचा प्रभाव आपल्या जिल्ह्यात खूपच वाढला आहे. बाधितांचे आकडे रोज हजारात येत आहेत. हे रोखण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. बाधित रुग्णांना बेडअभावी आपले प्राण गमवावे लागत आहेत. यालाच थोडासा हातभार म्हणून शामगाव ग्रामपंचायत व लोकसहभागातून येथे दहा बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन खोल्यांमध्ये हे सेंटर सुरू केले आहे. यामध्ये प्राथमिक सुविधा देण्यात येणार आहेत. त्यानंतर लोकसहभागातून ऑक्सिजन सुविधाही देणार आहे. त्याचबरोबर अजून बेडची संख्या वाढविणार असून, याचा फायदा गावातील रुग्णांना होणार आहे. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य भीमराव डांगे, सरपंच शीतल गायकवाड, उपसरपंच बाळासाहेब पोळ, ग्रामसेवक, डॉ. जरीना नदाफ, आरोग्यसेवक अरुण साळुंखे, ज्योती जाधव, सविता पोळ, सोनाली पोळ, सीमा पोळ, उषा फाटक, महेंद्र जाधव, युवराज पोळ, विजय पाटोळे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

===Photopath===

300521\img_20210529_105610.jpg

===Caption===

शामगाव ता कराड येथे कोविड सेंटरचे उदघाटन प्रसंगी

Web Title: 10 bed covid center at Shamgaon