जि.प. सदस्य, सरपंचांची उद्यापासून कोरोना आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST2021-04-27T04:28:00+5:302021-04-27T04:28:00+5:30

सांगली : जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सरपंच आणि ग्रामसेवक यांची बुधवारी आणि ...

Z.P. Member, Sarpanch Corona review meeting from tomorrow | जि.प. सदस्य, सरपंचांची उद्यापासून कोरोना आढावा बैठक

जि.प. सदस्य, सरपंचांची उद्यापासून कोरोना आढावा बैठक

सांगली : जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सरपंच आणि ग्रामसेवक यांची बुधवारी आणि गुरुवारी हे दोन दिवस ऑनलाइन आढावा बैठक घेण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी यांनी दिली.

प्राजक्ता कोरे म्हणाल्या की, कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. दिवसाला हजारावर रुग्णांची नोंद होत आहे. या वाढत्या प्रभावाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. बुधवारी शिराळा, वाळवा, पलूस, खानापूर आणि कडेगाव या चार तालुक्यांची, तर गुरुवारी आटपाडी, मिरज, जत आणि तासगाव या चार तालुक्यांची दुपारी एक वाजता ऑनलाइन बैठक घेतली जाणार आहे. बैठकीमध्ये सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितींचे सभापती, सरपंच आणि ग्रामसेवक सहभागी होणार आहेत. कोरोना लसीकरण, आवश्यक इंजेक्शन, गोळ्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कडक उपायोजना आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

Web Title: Z.P. Member, Sarpanch Corona review meeting from tomorrow