शिराळ्यात जिल्हा परिषद शाळा सक्षम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:25 IST2021-04-06T04:25:07+5:302021-04-06T04:25:07+5:30
कोकरुड : शिक्षकांनी लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळांचा कायापालट केला आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा समाजाची ...

शिराळ्यात जिल्हा परिषद शाळा सक्षम
कोकरुड : शिक्षकांनी लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळांचा कायापालट केला आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा समाजाची नवीन आव्हाने पेलण्यास सज्ज झाल्या आहेत. कोरोनाच्या काळात शाळांनी अंतरंग आणि बाह्यांग बदलून उल्लेखनीय काम केले आहे, असे प्रतिपादन नाठवडे केंद्राच्या केंद्रप्रमुख अलिशा मुलानी यांनी केले.
खुजगाव (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित केंद्रस्तरीय शालेय रेकॉर्ड स्पर्धेत विजेत्या शाळांना गौरवण्यात आले. यावेळी त्या बोलत होते. अध्यक्षस्थानी सुनील गुरव होते.
यावेळी नाठवडे जिल्हा परिषद शाळेचा प्रथम क्रमांक, शेडगेवाडी शाळेचा द्वितीय; तर खुजगाव शाळेने तृतीय क्रमांक पटकावला. गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर व विस्ताराधिकारी बाजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या. बाजीराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मण नायकवडी यांनी आभार मानले. यावेळी प्रतिभा दळवी, उषा जाधव, जयश्री तेली, शंकर करुंगलीकर, रवी घोलप उपस्थित होते.