ऑनलाईन निबंध लेखन स्पर्धेत युवराज पाटील प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:25 IST2021-04-10T04:25:47+5:302021-04-10T04:25:47+5:30

इस्लामपूर : येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागामार्फत व अग्रणी महाविद्यालय उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन ...

Yuvraj Patil first in online essay writing competition | ऑनलाईन निबंध लेखन स्पर्धेत युवराज पाटील प्रथम

ऑनलाईन निबंध लेखन स्पर्धेत युवराज पाटील प्रथम

इस्लामपूर : येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागामार्फत व अग्रणी महाविद्यालय उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध लेखन स्पर्धेत पन्हाळ्याचे युवराज पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

महाराष्ट्राच्या वीस जिल्ह्यांतील ४०५ निबंध पीडीएफ् स्वरूपात आले. त्यातून २५६ निबंध स्पर्धेस पात्र ठरले. स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी ४२ निबंध पात्र ठरले. प्रथम क्रमांक - युवराज बाळू पाटील (कोतोली, ता. पन्हाळा), दि्वतीय - ऋतुजा हणमंत जाधव (कापील, ता. कऱ्हाड), विषय - महिलांवरील लैंगिक अत्याचार : कारणे व उपाय, तृतीय - सर्जेराव रंगराव कांबळे (गारगोटी, ता. भुदरगड), चतुर्थ- अनिल राजाराम खटावकर (उरुण इस्लामपूर, ता. वाळवा) यांनी यश संपादन केले.

स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. शीला रत्नाकर, प्रा. डॉ. डी. जे. दमामे, प्रा. अमोल चांदेकर व प्रा. पांडुरंग पाटील यांनी केले. प्रा. राम घुल, प्रा. वृषाली पाटील, प्रा. डॉ. संजीवनी पाटील, प्रा. डॉ. मेघा पाटील, प्रा. डॉ. अंकुश बेलवटकर यांनी स्पर्धेचे संयोजन केले.

Web Title: Yuvraj Patil first in online essay writing competition