इस्लामपुरात तरुणांचा पोलिसाशी वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:27 IST2021-04-20T04:27:31+5:302021-04-20T04:27:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शहर आणि परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढतच असताना काही तरुण बेधडकपणे दुचाकीवरून सुसाट जात आहेत. ...

इस्लामपुरात तरुणांचा पोलिसाशी वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहर आणि परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढतच असताना काही तरुण बेधडकपणे दुचाकीवरून सुसाट जात आहेत. त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर पोलिसांसोबत हुज्जत घालत आहेत. विनाकारण हिंडणाऱ्या नागरिकांची रस्त्यावच रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात येत असतानाही चौकाचौकांत आणि रस्त्यांवर वर्दळ दिसत आहे.
सोमवारी सकाळी चौकाचौकांत पोलिसांचा ताफा बंदोबस्ताला होता. कचेरी चौकात एक तरुण दुचाकीवरून (एचएच १० एएल ९७३५) निघाला होता. तो विनामास्क असल्याने त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आणि ही दुचाकी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला; त्यावर त्याने कायदेशीर कारवाई करा, परंतु दुचाकी जप्त करता येणार नाही, असा वाद घातला. अशा घटना चौकाचौकांतून घडत आहेत. संचारबंदीत बहुतांशी तरुणच रस्त्यावर फिरताना दिसतात. कारणे सांगून पोलिसांना चकवा देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, त्यांच्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.
कोट
एका महिन्यात २२७९ दुचाकींवर कारवाई केली. त्यातून सात लाख ५६ हजार रुपयांचा दंड वसूल केला. २४७ विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली व दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या १७ जणांवर कारवाई केली. तरीसुद्धा कारणे सांगून दुचाकीस्वार रस्त्यावर विनाकारण फिरतात.
- अशोक जाधव, पोलीस वाहतूक उपनिरीक्षक