पेठनाक्यावर डोक्यात दगड घालून युवकाचा खून

By Admin | Updated: July 23, 2014 23:15 IST2014-07-23T23:14:30+5:302014-07-23T23:15:54+5:30

चौघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात

Youth's blood on the top of the pillow is laid | पेठनाक्यावर डोक्यात दगड घालून युवकाचा खून

पेठनाक्यावर डोक्यात दगड घालून युवकाचा खून

इस्लामपूर / पेठ : पेठनाका (ता. वाळवा) येथील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलालगत असणाऱ्या खानावळीमागे एका ३० वर्षीय युवकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. ही घटना काल, मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. अनैतिक संबंधाच्या कारणातून हा खून झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी चौघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले.
अमोल शामराव पवार (वय ३०, रा. भीमनगर, पेठ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. अज्ञातांनी डोक्यात मोठा दगड घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी हा दगड जप्त केला आहे. मृत अमोल पवार हा राष्ट्रीय महामार्गाची देखभाल करणाऱ्या रस्ते विकास महामंडळाकडे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामावर रोजंदारीने कामास होता. काल सकाळी तो आपला सहकारी नासीर याच्यासोबत कामावर जातो म्हणून घराबाहेर पडला होता. त्याला दारूचेही व्यसन होते.

Web Title: Youth's blood on the top of the pillow is laid