कांकणवाडी रस्त्यावर तरुणाला ४८ हजारांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:31 IST2021-08-25T04:31:12+5:302021-08-25T04:31:12+5:30
सांगली : तासगाव-मिरज रस्त्यावरील कांकणवाडी गावाच्या हद्दीत कुपवाडच्या तरुणावर कोयत्याने हल्ला करून लुटण्यात आले. दोन अज्ञात चोरट्यांनी सोन्याची अंगठी ...

कांकणवाडी रस्त्यावर तरुणाला ४८ हजारांना लुटले
सांगली : तासगाव-मिरज रस्त्यावरील कांकणवाडी गावाच्या हद्दीत कुपवाडच्या तरुणावर कोयत्याने हल्ला करून लुटण्यात आले. दोन अज्ञात चोरट्यांनी सोन्याची अंगठी व ३३ हजारांची रोकड असा ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी रोहन पांडुरंग पाटील (वय २९, रा.उत्कर्षनगर, कुपवाड रोड सांगली) याने सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रोहन पाटील हा खासगी नोकरी करतो. २० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तो कामावरून घरी निघाला होता. तासगाव-मिरज रस्त्यावरील कांकणवाडी गावाच्या हद्दीतील दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या दुचाकीच्या आडवी मोटारसायकल घालून अडविले. दोघांनी त्याच्या ओढत बाजूच्या उसाच्या शेतात नेले. तिथे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच कोयत्यानेही वार करण्यात आले. या त्याच्या करंगळीला जखम झाली. चोरट्यानी त्याच्या पाकीट व खिशातील १३ हजारांची रोकड, सोन्याची अंगठी काढून घेतली, तसेच त्याला एचडीएफसी बँकेच्या एमटीएमवरून २० हजार रुपये काढून घेत, कुमठे फाटा येथे आणून सोडले. परत मागे वळून बघायचे नाही, अशी दमदाटी करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.