युवकांनी शक्ती, भक्तीचा संगम साधावा : जितेंद्र लोकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:27 IST2021-04-02T04:27:13+5:302021-04-02T04:27:13+5:30
वारणावती : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शक्तीचे प्रतीक असून, जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे भक्तीचे प्रतीक ...

युवकांनी शक्ती, भक्तीचा संगम साधावा : जितेंद्र लोकरे
वारणावती : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शक्तीचे प्रतीक असून, जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे भक्तीचे प्रतीक आहेत. युवकांना यशस्वी व समृद्ध जीवन जगण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांचा आदर्श घेऊन शक्ती व भक्तीचा संगम साधणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिव व्याख्याते जितेंद्र लोकरे यांनी केले.
बेरडेवाडी (ता. शिराळा) येथे नवतरुण मित्र मंडळ, शिवतेज ग्रुप आयोजित शिवजयंतीनिमित्त 'छत्रपती शिवाजी महाराज एक युगपुरुष" या विषयावर जितेंद्र लोकरे बोलत होते.
लोकरे म्हणाले, आदर्श व समृद्ध देश घडविण्यासाठी इथल्या तरुण पिढीने छत्रपती शिवाजी महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या महान कार्याची प्रेरणा घेतली पाहिजे. महापुरुषांचे विचार व संस्कार आचारात आणून स्वतःची व समाजाची प्रगती साधण्यासाठी कार्यतत्पर असणे खूप गरजेचे आहे.
यावेळी गावातील कुमारी श्रावणी पाटील, श्रेया कंदारे, पल्लवी बेरडे, वैष्णवी बेरडे यांनी स्वराज्याची शपथ हे ऐतिहासिक नाटक सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ज्योती बेरडे हिने आपल्या ओघवत्या वाणीने शिवचरित्र उभे केले. यावेळी अध्यक्ष आनंदा बेरडे, लक्ष्मण पाटील, आनंद कंदारे, लक्ष्मण बेरडे, एकनाथ बेरडे, बबन कंदारे, आदी मान्यवर उपस्थित होते. तुकाराम पाटील यांनी प्रास्ताविक केले. नारायण बेरडे यांनी सूत्रसंचालन केले.