तरुणांनी आपली संस्कृती जपावी

By Admin | Updated: November 27, 2015 00:07 IST2015-11-26T22:54:03+5:302015-11-27T00:07:14+5:30

सिंधुताई सपकाळ : ‘आदर्श’ मातांचा कवठेपिरानमध्ये गौरव

The youth should give their culture | तरुणांनी आपली संस्कृती जपावी

तरुणांनी आपली संस्कृती जपावी

दुधगाव : तरुणांनी आपल्या संस्कृतीचे जतन करावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी केले. कवठेपिरान (ता. मिरज) येथे बुधवारी सायंकाळी सपकाळ यांच्याहस्ते ‘आदर्श’ मातांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ. जयंत पाटील होते. कवठेपिरान येथे जयंत पाटील युथ फौंडेशनच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सपकाळ पुढे म्हणाल्या, आजच्या धावत्या युगात संगणकामुळे जनजीवन धावपळीचे होत चालले आहे. दिवसेंदिवस धावत्या युगात संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे. तरुण आणि तरुणींनी आपली संस्कृती जपण्याची गरज आहे. आजच्या युगामध्ये सपकाळ यांनी आपल्या जीवनचरित्राचा इतिहासही तरुणांच्या डोळ्यासमोर ठेवला. त्यांनी ‘आई’ या विषयावरही व्याख्यान दिले. तसेच या परिस्थितीत परंपरा व संस्कृतीकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्या जपण्यासाठी मातांनीही लक्ष दिले पाहिजे, असे आवाहनही सिंधुतार्इंनी केले. यावेळी सिंंधुतार्इंनी आपला जीवनपटही उलगडला. कार्यक्रमाचे दीपप्रज्ज्वलन अध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात १९८५ मधील सिंधुताई सपकाळ यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व जयंत फौंडेशनला मदत करण्याची ग्वाहीही दिली. तसेच प्रा. संग्राम जाखलेकर व अवधूत पाटील यांनी गावाच्या विकासासाठी जयंत फौंडेशन सतत कार्यरत राहील, अशी ग्वाही दिली.प्रास्ताविक दत्ता पाटील यांनी केले. यावेळी वाळवा तालुका राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष संजय पाटील (बापू), उद्योजक भालचंद्र पाटील, पंचायत समितीचे सदस्य प्रमोद आवटी, अरुण साळुंखे, सचिन पाटील, रघु दिडे, एम. डी. खंबाळे, बाबूराव कालेकर, गजानन पाटील, प्रताप गुरव यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)


यांचा झाला गौरव
या कार्यक्रमात श्रीमती मंगल पाटील, सौ. प्रमिला जैनापुरे, श्रीमती कल्पना जाधव, श्रीमती वत्सला माणगावे, सौ. आफसाना मुजावर, श्रीमंती आनंदीबाई दिंडे आदी आदर्श मातांचा यावेळी गौरव करण्यात आला.

Web Title: The youth should give their culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.