शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: रस्त्याकडेला उभे होते, भरधाव मोटारीने फरफटत नेले; युवक गंभीर जखमी

By अविनाश कोळी | Updated: November 11, 2023 18:38 IST

कोकरुड : शेडगेवाडी (ता. शिराळा) येथे एका सर्व्हिस सेंटरसमोर उभ्या असलेल्या दुचाकीला भरधाव मोटारीने धडक देत दुचाकीवरील तरुणास चाळीस ...

कोकरुड : शेडगेवाडी (ता. शिराळा) येथे एका सर्व्हिस सेंटरसमोर उभ्या असलेल्या दुचाकीला भरधाव मोटारीने धडक देत दुचाकीवरील तरुणास चाळीस फूट फरफटत नेले. अपघातात रतन भास्कर हा युवक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना काल, शुक्रवारी घडली. याबाबत कोकरुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड-शेडगेवाडी राज्य मार्गावर एका सर्व्हिस सेंटरसमोर कराडच्या दिशेने दुचाकी (एमएच ०९ एफसी ७३५५) उभी होती. या दुचाकी शेजारी योगेश सखाराम कांबळे आणि रतन भास्कर कांबळे (दोघे रा. मालेवाडी, ता. शाहुवाडी) उभे होते. दरम्यान कराडहून शेडगेवाडीकडे भरधाव वेगात आलेल्या मोटार चालक लक्ष्मण विठ्ठल कांबळे यांचा मोटारीवरील (एमएच १४ ईसी १७३७) ताबा सुटला. यावेळी मोटारीची विरुद्ध दिशेला दुचाकीला जोराची धडक झाली. धडक इतकी जोराची होती की, दुचाकी शेजारी उभे असलेले दोघे तरुण ४० फूट फरफटत गेले. अन् मोटार विजेच्या खांबाला धडकली. अपघातात रतन भास्कर गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची फिर्याद योगेश कांबळे यांनी कोकरुड पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी चालक लक्ष्मण कांबळे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात