आष्ट्यात युवक राष्ट्रवादीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST2021-07-04T04:18:56+5:302021-07-04T04:18:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : केंद्र सरकारने देशात घरगुती गॅस व इंधनात केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ शनिवारी आष्टा शहर ...

आष्ट्यात युवक राष्ट्रवादीचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : केंद्र सरकारने देशात घरगुती गॅस व इंधनात केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ शनिवारी आष्टा शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजी चोरमुले यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.
नगरसेवक अर्जुन माने, सतीश माळी, विजय मोरे, राजू माने यांनी केंद्र सरकारने इंधन व घरगुती गॅसची दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी केली. यावेळी प्रभाकर जाधव, जगन्नाथ बसुगडे, गुंडा मस्के, राजकेदार आटूगडे, शकील मुजावर, संदीप माने, सुरज ऐतवडे, सुहास मेथे, संग्राम जाधव, जयदीप थोटे, किरण काळोखे, प्रशांत मालगावे, भीमराव डोंबाळे, अनिल पाटील, पिंटू शेळके, बिरु येडगे, नूर मुजावर, उत्कर्ष माने, सयाजी गावडे उपस्थित होते.
फोटो :
आष्टा येथे युवक राष्ट्रवादीने महागाईविरोधात आंदोलन केले. यावेळी शिवाजी चोरमले, अर्जुन माने, विजय मोरे, सतीश माळी, राजू माने, राजकेदार आटुगडे, जयदीप थोटे, आदी उपस्थित होतेे.