शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीचे युवा नेते अस्वस्थ, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 17:57 IST

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी हाेणार? याबाबत प्रश्नचिन्ह कायम

अशोक पाटीलइस्लामपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी हाेणार? याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. राजकीयदृष्ट्या नेहमीच संवेदनशील असलेल्या वाळवा-शिराळा तालुक्यात गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादीतील युवा नेत्यांनी जाेरदार तयारी केली आहे. परंतु, निवडणुकीसंदर्भातील निर्णय न्यायालयीन कक्षेत प्रलंबित आहे. त्यामुळे तिसऱ्या फळीतील सर्वच युवा नेते अस्वस्थ आहेत.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील इस्लामपूर मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भातील सर्व सूत्रे राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील यांच्याकडे देण्याची शक्यता हाेती. परंतु, निवडणुकाच लांबणीवर पडल्या आहेत.आष्टा शहरासह परिसरातील काही गावात दिवंगत आमदार विलासराव शिंदे यांचा गट प्रबळ आहे. त्यांचे चिरंजीव वैभव शिंदे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत. गतवेळी बागणी जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीच्या वतीने त्यांनी निवडणूक लढवली होती. परंतु, बंडखोरी झाल्यामुळे शिंदे यांचा पराभव झाला. त्यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे त्यांचे लक्ष्य लागून राहिले आहे.वाळवा तालुक्यातील शिराळा मतदारसंघात असलेल्या ४८ गावांतीलही राष्ट्रवादीचे तिसऱ्या फळीतील नेते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत. या भागातील जबाबदारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता होती. परंतु, निवडणुकाच लांबणीवर पडल्याने ४८ गावांतील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.

शिराळा मतदारसंघात आमदार मानसिंगराव नाईक यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव विराज नाईक राष्ट्रवादीची जबाबदारी पेलत आहेत. त्यांना ताकद देण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांचीही साथ मोलाची आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीतील तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची ताकद मजबूत करण्यासाठी दोन नाईक एकत्र आले आहेत. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नसल्याचे चित्र आहे. एकंदरीत आगामी स्थानिक संस्थेच्या निवडणुकीकडे डोळे लावून बसणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.

स्थानिक संस्थेच्या निवडणुका पाच वर्षांत घेणे शासनाची घटनात्मक जबाबदारी आहे. परंतु, आरक्षणाचा विषय न्यायालयीन कक्षेत आहे. त्यामुळे निवडणूका लांबणीवर पडत आहेत. शासनाने जबाबदारीने हा निर्णय लागण्यासाठी न्यायालयात आपली बाजू त्वरित मांडणे गरजेचे आहे. - रणधीर नाईक, माजी जि. प. सदस्य

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस