अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

By Admin | Updated: June 10, 2014 02:12 IST2014-06-10T01:46:27+5:302014-06-10T02:12:35+5:30

वाघवाडीजवळ घटना : गुन्हा नोंद नाही

Youth killed in an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

इस्लामपूर : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाघवाडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत राजारामनगर येथील प्रशांत आनंदराव धनवडे (वय २८) याचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवार, दि. ६ रोजी होऊनही अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही. राजारामबापू साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचारी आनंदराव धनवडे यांच्या एकुलत्या एका मुलावर काळाने घाला घातल्याने कारखाना परिसर व कुरळप गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रशांत बॉम्बे रेआॅनमध्ये नोकरी करीत होता़ तो दुपारी ३ ते रात्री ११ अशी ड्युटी करून सायकलवरून घरी येत असताना, वाघवाडी फाट्यावर त्याच्या सायकलला एका वाहनाने जोराची धडक दिली़ यामध्ये त्याच्या डोक्यास गंभीर मार लागला. त्यांच्या सहकारी तरुणाने त्यांना राजारामबापू हॉस्पिटलमध्ये नेले़ तेथून कऱ्हाडच्या कृष्णा व सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेले असताना, त्याला कोल्हापूरच्या सी़ पी़ आऱ मध्ये नेण्याची सूचना केली़ पण सी.पी.आर.मध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. (वार्ताहर)
 

Web Title: Youth killed in an unknown vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.