शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरजेत कोयता हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू, आठजणांवर खुनाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 18:26 IST

पत्नीने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला

मिरज : मिरजेत गणेश तलाव येथे पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या निखिल विलास कलगुटगी (वय २६, रा. मिरज) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन अल्पवयीनसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.खूनप्रकरणी प्रथमेश ढेरे, विशाल शिरोळे, सर्फराज सय्यद व प्रतीक चव्हाण (सर्व रा. मिरज) यांसह दोन अल्पवयीन व दोन अनोळखी अशा आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश ढेरे, विशाल शिरोळे, सर्फराज सय्यद व प्रतीक चव्हाण हे चौघेजण रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्याच्यावर अपहरण, खुनी हल्ला, बेकायदा हत्यार बाळगणे, असे गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल आहेत.तीन महिन्यांपूर्वी प्रथमेश ढेरे व त्याच्या साथीदारांनी शहरात भरदिवसा ऋषिकेश कलगुटगी याचा भाऊ रोहन याच्यावर एका सलून दुकानात गोळीबार करून त्याचा खुनाचा प्रयत्न केला होता. रोहन त्या हल्ल्यातून बचावला होता. त्यावेळी ऋषिकेश याचा मामा निखिल कलगुटगी याने त्यास मदत केली होती. याचा रागातून त्यांच्यात धुसफूस सुरू होती. शनिवारी रात्री १० वाजता गणेश तलावाजवळ निखिल कलगुटगी गेला होता. त्यावेळी गणेश तलावाजवळ तानाजी रस्त्याच्या फुटपाथ जवळ प्रथमेश ढेरे त्याच्या साथीदारांनी निखिल याच्यावर कोयता व अन्य हत्यारांनी अचानक हल्ला चढविता.निखिल याच्या डोक्यात सपासप वार करून गंभीर जखमी केले. निखिल रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी निखिल यास उपचारासाठी मिरज सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना शनिवारी मध्यरात्री निखिल याचा मृत्यू झाला. निखिल कलगुटगी हा एका राजकीय पक्षात पक्ष प्रवेश करणार होता. त्यापूर्वीच त्याच्या विरोधकांनी त्याचा काटा काढल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

तिघांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाहीनिखिल कलगुटगी याच्या खुनात अन्य चार जणांचा सहभाग असून, त्यांच्यावरही कारवाईची मागणी करीत निखिल याच्या पत्नीने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. चार जणांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा त्यांनी पवित्रा घेतला. नातेवाइकांच्या तक्रारीची दखल घेऊन तपास करण्यात येईल, आणखी आरोपी निष्पन्न झाल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांनी दिले. त्यामुळे पाच तासांनंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Youth Dies in Miraj Attack, Murder Case Filed Against Eight

Web Summary : Nikhil Kalagutgi died after a Miraj attack rooted in past animosity. Police arrested three, including two minors, and charged eight with murder. The attack stemmed from a previous attempt on the victim's relative.