पाडळीवाडीत ट्रॅक्टरखाली सापडून युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:26 IST2021-03-19T04:26:07+5:302021-03-19T04:26:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : पाडळीवाडी (ता. शिराळा) येथे शेत ट्रॅक्टरने नांगरट करत असताना ट्रॅक्टरमधून पडून चाकाखाली सापडल्याने राहुल ...

Youth found dead under tractor in Padliwadi | पाडळीवाडीत ट्रॅक्टरखाली सापडून युवक ठार

पाडळीवाडीत ट्रॅक्टरखाली सापडून युवक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : पाडळीवाडी (ता. शिराळा) येथे शेत ट्रॅक्टरने नांगरट करत असताना ट्रॅक्टरमधून पडून चाकाखाली सापडल्याने राहुल नारायण पाटील (वय २५, रा. पाडळीवाडी) या युवकाचा मृत्यू झाला. सदर घटना बुधवार दि.१७ रोजी रात्री दीड ते पहाटे ५ च्या दरम्यान घडली.

याबाबत शिराळा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, मयत राहुल हा सागर पाटील यांच्या ट्रॅक्टर (एमएच १० एक्यू २२४५) वर चालक म्हणून काम करत होता. पाडळीवाडी येथील अर्जुन पाटील यांच्या शेतामध्ये ट्रॅक्टरने नांगरट करण्यासाठी तो आला होता. रात्री दीड वाजेपर्यंत नांगरट चालू असलेली पाहून व कश्या पद्धतीने नांगरट करायची हे सांगून पांडुरंग पाटील व आकाश अर्जुन पाटील हे पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी निघून गेले. यानंतर पहाटे पाचच्या दरम्यान ते नांगरट किती झाली हे पाहण्यासाठी आले असता मयत राहुल हा ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली सापडून मयत झाल्याचे आढळून आले. याबाबत पांडुरंग पाटील यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुमार वायदंडे हे करीत आहेत. मयत राहुल याच्या पश्चात आई, भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

Web Title: Youth found dead under tractor in Padliwadi