बिबट्यापासून कुत्र्याच्या बचावासाठी तरुणाचा जुगाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:17 IST2021-03-30T04:17:54+5:302021-03-30T04:17:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : बिबट्याच्या हल्ल्यापासून घरातील पाळीव कुत्र्याचा बचाव करण्यासाठी अंत्री बुद्रुक (ता. शिराळा) येथील भूषण पाटील ...

बिबट्यापासून कुत्र्याच्या बचावासाठी तरुणाचा जुगाड
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : बिबट्याच्या हल्ल्यापासून घरातील पाळीव कुत्र्याचा बचाव करण्यासाठी अंत्री बुद्रुक (ता. शिराळा) येथील भूषण पाटील याने लोखंडी पट्टीला खिळे बसवून गळ्यात बांधण्यासाठी पट्टा तयार केला आहे. त्यामुळे कुत्र्याचा बिबट्यापासून बचाव होईल. त्याच्या या गावठी जुगाडाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे घरचा रखवालदार कसा वाचवायचा, हा प्रश्न सर्वांना पडल्याने अशा वेगवेगळ्या क्लुप्त्या लढविण्याची वेळ शिराळकरांवर आली आहे. तालुक्यात दररोज कोणत्या ना कोणत्या गावात बिबट्याचे दर्शन, पाळीव प्राण्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडत आहेत. अनेक गावांतील कुत्री बिबट्याने फस्त केली असल्याने, कुत्र्यांची संख्या घटू लागली आहे.
अंत्री येथे अनेक कुत्री बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली आहेत. आता असणारी कुत्री कशी वाचवायची, हा प्रश्न पडला आहे. त्यासाठी अंत्रीच्या भूषण पाटील या युवकाने लोखंडी पट्टीला खिळे बसवून गळ्यात बांधण्याचा पट्टा तयार केला आहे. बिबट्या शक्यतो मान पकडतो. अशा वेळी मानेला असणाऱ्या पट्ट्याला खिळे असल्याने कुत्र्याचा बचाव होईल, हा त्यामागील उद्देश आहे.