शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत बेरोजगारीच्या प्रश्नावर युवक कॉंग्रेसचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 13:13 IST

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील बेरोजगारी वाढल्याची टीका करीत सांगलीत युवक कॉंग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. बेरोजगार दिन साजरा करून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध यावेळी करण्यात आला.

ठळक मुद्देसांगलीत बेरोजगारीच्या प्रश्नावर युवक कॉंग्रेसचे धरणे आंदोलनविडंबनात्मक बेरोजगार दिन साजरा

सांगली : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील बेरोजगारी वाढल्याची टीका करीत सांगलीत युवक कॉंग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. बेरोजगार दिन साजरा करून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध यावेळी करण्यात आला. युवक कॉंग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस भवनाजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी मंगेश चव्हाण म्हणाले की, वर्षाला दोन कोटी रोजगारनिर्मिती करण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान मोदी सरकार सत्तेवर आले. प्रत्यक्षात या सरकारने बेरोजगारी वाढविली.

नोटबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगारनिर्मिती करणाऱ्या कृषी, सूक्ष्म-लघु-मध्यम उदयोग क्षेत्राला मोठा फटका बसला. त्याची परिणती कुटीर, लघु व मध्यम क्षेत्रातील उद्योगांचे कंबरडे मोडले गेले. त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. सरकारच्या भारतीय सांख्यीकी आयोगाच्या अहवालानुसार देशात २0१७-१८ या वर्षात बेरोजगारीचा दर ६.१ टक्के असून ग्रामीण भागातला बेरोजगारीचा दर ५.३ टक्के झाला तर शहरी भागात ७.८ टक्के राहिला.

तरुणामध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक, म्हणजे १३ ते २७ टक्क्यांवर पोहोचला होता. यानंतर कोरोनामुळे काहीही नियोजन न करता लादलेल्या लॉकडाऊनमुळे १२ ते १३ कोटी लोक बेरोजगार झाले असल्याचे पाहणीतून समोर आले आहे. तेवढ्याच कुटुंबाचे जगणे रोजगाराविना मुश्किल झाले आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली.पंतप्रधान मोदी यांच्या लहरी व चुकीच्या धोरणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा मोदी पूर्णत्वास नेत आहेत. मोदींनी दिलेले आश्वासन पाळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.या आंदोलनात मगेश चव्हाण, संदीप जाधव, सौरभ पाटील, उत्कर्ष खाडे, सनी धोत्रे,अरविंद पाटील, योगेश राणे, सोहेल बलबंड, मयुर पेडणेकर, आशिष चौधरी, शुभम बनसोडे, सलीम मुजवार, ताजुद्दीन शेख. तकलिम मुजावर, अथर्व कराडकर, नायक लाटणे, संग्राम चव्हाण, शफिक शिकलगार, समीर मुजावर, शकलेन मुजावर, श्रीकांत साठे, ओंकार पाटील आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसSangliसांगली